Ahilyanagar corruption case : अमल चढणाऱ्या गांजा या अंमली पदार्थाच्या प्रकरणात मदतीसाठी पाच लाख रुपयांची लाच मागितली. ते प्रकरण दीड लाख रुपयांवर सेटल्ड झाले. या लाचप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अहिल्यानगरऐवजी थेट नाशिक पथकाडून कारवाई झाली.
या प्रकरणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील अहिल्यानगरमधील स्थानिक नेते अशोक गायकवाड आणि कोतवाली पोलिस ठाण्यातील सहाकय फौजदार राजेंद्र गर्गे या दोघांना अटक झाली आहे. तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, दोघांना एक दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावल्याची माहिती उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांनी दिली.
राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील (Mahayuti) अजित पवार यांच्या पक्षातील आणि आंबेडकरी चळवळीतील स्थानिक नेता अशोक गायकवाड (वय 71, व्यवसाय- शेती , रा. बिशप लॉईड कॉलनी, सावेडी, जि. अहिल्या गर) थेट लाचेच्या गुन्ह्यात अडकल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण मिटवण्यासाठी सुरवातीला पाच लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. त्यामुळे गांजा प्रकरण अहिल्यानगर पोलिस दलात चर्चेत आले आहे. असे काय आहे या प्रकरणात, सुरवातील पाच लाख रुपयांची लाच मागितली आणि एका नेत्याने यात हस्तक्षेप केला, याची जोरदार चर्चा आहे. या प्रकरणात अनेक कंगोरे असल्याची देखील चर्चा आहे.
या लाचेत अडकेलला कोतवाली पोलिस (Police) ठाण्याच्या गोपनीय शाखेतील सहायक फौजदार राजेंद्र गर्गे (रा. समर्थनगर, सावेडी, जि. अहिल्यानगर) हा पुढील महिन्यात सेवानिवृत्त होत आहे. तत्पूर्वी जेवढी वरची कमाईचा सपाटा लावला होता, अशी दबक्या आवाजा कोतवाली पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे. त्यातून मोठा हात मारण्याच्या नादात, फसला असे सांगितले जात आहे.
तसं राजेंद्र गर्गे याने अहिल्यानगर शहरातील पोलिस ठाण्यांमध्येच नोकरीतील बरीच वर्षे काम केलं आहे. त्यामुळे पोलिस दलातील बारीक-सारीक गोष्टींविषय त्याला इत्यंभूत असते. पोलिस दलातील गोपनीय विभागात नोकरीचा बराच कालावधी गर्गे याने घालवला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्याचा थेट संबंध असतो.
अशोक गायकवाड याचा थेट आंबेडकरी चळवळीशी संबंध आहे. त्यामुळे राज्यपातळीवर नेत्यांशी त्यांचा थेट संबंध आहे. महाविकास आघाडी काळात ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षात होते. सत्तांतर झाल्यानंतर महायुतीमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस नुकताच प्रवेश केला.
राज्यपातळीवर मोठ्या राजकीय नेत्यांशी त्याचे संबंध असल्याने स्थानिक पातळीवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते दचकून राहतात. अशी दोन मोठी व्यक्ती गर्गे अन् गायकवाड लाचेच्या गुन्ह्यात अटक केल्याने खळबळ उडाली आहे. या दोघांना न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अहिल्यानगर पथकाचे उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांनी सांगितले.
तक्रारदाराला कोतवाली पोलिस ठाण्यातील गांजाच्या नोंदवलेल्या केसमध्ये आरोपी न करता साक्षीदार करणेचे मोबदल्यात कोतवाली पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार राजेंद्र प्रभाकर गर्गे याने मध्यस्थी खासगी व्यक्ती अशोक रामचंद्र गायकवाड याच्यामार्फत लाच मागितली. 20 ऑगस्टला लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या नाशिकच्या पथकाने या तक्रारीची पडताळणी केली. यात लाचेच्या तक्रारीत तडजोडीत 1 लाख 50 हजार रुपये घेण्याचे ठरले. या लाचेच्या मागणीस सहायक फौजदार राजेंद्र गर्गे याने प्रोत्साहन दिल्याचे तपासात स्पष्ट झालेले आहे. लाचेची रक्कम घेऊन तक्रारदार 21 ऑगस्टला अशोक गायकवाड याच्याकडे देण्याकरिता गेला. तेव्हा ती रक्कम स्वीकारल्याचे पथकाच्या लक्षात येताच, कारवाई केली. नाशिक पथकाच्या पोलिस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.