Ahilyanagar Muslim mob violence Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar Muslim mob violence : अहिल्यानगरमध्ये हिंसाचार, चार वेगवेगळ्या फिर्यादी, 290 जणांविरोधात गुन्हे; 'मास्टरमाइंड' गजाआड

Ahilyanagar Police Book 290 People in ‘I Love Muhammad’ Rangoli Mob Violence Case : 'आय लव्ह मोहम्मद' रांगोळीवरून अहिल्यानगर मुस्लिम जमावाने केलेल्या हिंसाचार प्रकरणाशी निगडीत वेगवेगळे चार गुन्हे दाखल झाले आहेत.

Pradeep Pendhare

Ahilyanagar police FIR : अहिल्यानगरमध्ये शिव प्रतिष्ठान हिंदुस्तानच्या दुर्गा माता दौड मार्गावर आय लव्ह मोहम्मद ही रांगोळी रेखाटल्याने शहरातील मुस्लिम आक्रमक झाले. या प्रकाराच्या निषेधार्थ आज सकाळी अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्ग कोठला परिसरात रोखून धरला. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आक्रमक जमावाने यावेळी बेछुट दगडफेक केली. यात परिसरातील वाहनांचे, दुकानाचे मोठे नुकसान झाले. तसंच बंदोबस्तावरील सात पोलिस अन् एक महिला होमगार्ड जखमी झाले.

दरम्यान, पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला व धरपकड करीत सुमारे 32 जणांना ताब्यात घेतले असून त्यात काही अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात सुमारे 150 ते 200 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पसार संशयितांची धरपकड रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अहिल्यानगर शहरात तणावपूर्ण शांतता असून ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला आहे. याप्रकरणाशी निगडीत वेगवेगळ्या चार फिर्यादी दाखल झाल्या असून, सुमारे 290 जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहे.

अहिल्यानगर शहरातील बारातोंटी कारंजा इथं आयोजित धार्मिक कार्यक्रमासाठी रस्त्यावर काढलेल्या रांगोळीतील मजकूरावरून मुस्लिमांच्या (Muslim) धार्मिक भावना दुखावल्या. शेख अल्तमश सलिम जरीवाला (वय 34, रा. पिरशाहखुंट, अहिल्यानगर) यांनी कोतवाली पोलिस फिर्याद दिली. आरती संग्राम रासकर व संग्राम आसाराम रासकर (रा. बारातोंटी कारंजा) या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला. संग्राम रासकर याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मुस्लिम जमाव आक्रमक होता. पोलिस ठाण्याबाहेर जमावाने निदर्शने केली. तिथं धुडगूस घातला. यावेळी कोतवाली पोलिसांनी (Police) जमावावर सौम्य लाठीचार्ज केला. त्याच दरम्यान प्रवीण संजय खराडे (वय 20 हल्ली रा. माळीवाडा, अहिल्यानगर, मुळ रा. कर्जत) हा युवक आपल्या मित्रासह वाहनाची चावी बनवण्यासाठी कोतवाली पोलिस ठाण्यासमोरील तक्ती दरवाजा परिसरात आला होता. त्यावेळी पोलीस ठाण्याबाहेर अंदाजे 60 ते 70 युवक जमा झालेले होते. चावी बनवताना प्रवीण खराडे बाजूला उभे असतानाच, अचानक जमावातील 10 ते 15 अनोळखी युवक त्यांच्या जवळ आले. हाच होता, हाच तो, असे म्हणत त्यांनी प्रविणला मारहाण केली. यात तो जखमी झाला आहे. यासंदर्भात प्रवीणने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात अनोळखी 10 ते 15 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुस्लिम जमावाने कोठला परिसरात रास्ता रोको आंदोलन केले. तिथं जमावाने बेछुट दगडफेक केले. यामुळे शहरात तणाव झाला आहे. कोठला परिसरात दगडफेक व तोडफोड प्रकरणी सुमारे 32 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिस अंमलदार तनवीर शेख यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुमारे 150 ते 200 लोकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जमावाच्या दगडफेकीत पोलिस अंमलदार बाबासाहेब भापसे, रोहिदास हरदास, सिध्दांत बडे, नवनाथ साळुंके, विकास साबळे, दादासाहेब जाधव, बाळासाहेब कदम व होमगार्ड शैला आडोळे जखमी झाले आहेत.

दौड मार्गावर मांसाचे तुकडे फेकले

अहिल्यानगर शहरात शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान दुर्गा माता दौड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते मंगलगेट अशी ही दौड झाली. दरम्यान, दौड मार्गावर भाविकांनी स्वागतासाठी ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या. मात्र, सकाळी साडेसात ते आठ वाजताच्या दरम्यान माळीवाडा इथल्या केवळ हॉस्पिटल ते बुरूड गल्ली परिसरात, बॉम्बे बेकरी जवळ, अज्ञात व्यक्तींनी दौड मार्गावर हाडांचे तुकडे व मांसाचे तुकडे टाकल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याने कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देविदास भीमराव मुदगल (वय 45, रा. नालेगाव, गाडगीळ पटांगण) यांनी फिर्याद दिली आहे.

मंत्री विखे पाटलांकडून शांततेचं आवाहन

अहिल्यानगर शहरात घडलेल्या घटनेबाबत पोलिस प्रशासनाने योग्य कारवाई केली आहे. मात्र कोणी कायदा हातात घेवून सामाजिक शांतता बिघविण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिल्या असल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. कोणत्याही आफवांवर विश्‍वास न ठेवता जिल्ह्यात शांतता राखण्याचे आवाहन त्यांनी केले.

जगतापांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

पोलिस ठाण्यासमोरच लावण्यात आलेल्या वादग्रस्त फलक व तरूणाला झालेल्या मारहाणीवरून आमदार संग्राम जगताप आक्रमक होत, त्यांनी संबधितांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी कोतवाली पोलिस ठाण्यात 2 तास ठिय्या दिला. यावेळी बोलताना आमदार जगताप म्हणाले, "पवित्र नवरात्र उत्सव सुरू आहे. मात्र शहरात काहींनी जातीय तेढ निर्माण करणारे फलक मुद्दाम लावण्यात आले आहे. हे फलक त्वरित काढण्यात यावेत. संबधितांवर कायदेशीर कारवाई करावी. शहरातील सर्व नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता ठेवावी."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT