
Ahilyanagar communal tension news : 'आय लव्ह मोहम्मद', अशी रांगोळी रस्त्यावर काढल्याने अहिल्यानगरमध्ये तणाव निर्माण झालेला आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असली, तरी सणासुदीत बाजारपेठेवर तणावाची छाया आहे.
घडलेल्या घटनेप्रकरणी वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून, याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत वरिष्ठ पोलिसांनी दिले. दरम्यान, या प्रकारावर आमदार संग्राम जगताप यांनी प्रतिक्रिया दिली.
आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) म्हणाले, "अहिल्यानगर शहरांमध्ये हिंदूंचे विविध धार्मिक उत्सव सुरू आहेत, पुढे सणासुदीचे दिवस आहेत. यातच शहरातील काही भागात भावना दुखावणारे मजकूर असलेले फलक लागले आहेत. फलक लावण्याबद्दल दुमत नाही. परंतु त्यातून आव्हान देण्याचे प्रकार झालेत. हे फलक नेमके पोलिस ठाण्यांसमोर लावण्यात आलेत."
'या फलकांवरचा मजकूर पाहिल्यास, 'मेरा घर जला दो, कोई शिकवा ना होगा! मुझे कत्ल कर दो, बदला ना होगा! मगर शहाणे मोहम्मद, पर बात आई तो तलवार उठेंगी, ना कोई समजता होगा!' असा असल्याकडे आमदार जगतापांनी लक्ष वेधलं. लोकशाही असलेल्या देशात, संविधान मानतो. अशी तलवार उठवण्याच्या गोष्टी फलकाद्वारे होत आहेत. विशेष म्हणजे, अशी फलक पोलिस ठाण्यात बाहेर लागले आहेत,' असे आमदार जगताप यांनी म्हटले.
'हे फलक काढण्यासाठी पोलिस (Police) आणि महापालिका प्रशासनातील कर्मचारी अधिकारी गेले होते. तरी देखील फलक काढले गेले नाहीत. फलक का काढले नाहीत? कोणामुळे काढले नाहीत? कोणाचा फोन झाला? कशामुळे काढले नाहीत, हे सर्व जनतेसमोर आलं पाहिजे,' असे सांगत यामागे कुठेतरी राजकारण असल्याचे सूचक विधान आमदार जगताप यांनी केले.
'शिव प्रतिष्ठान हिंदुस्तानच्यावतीने 'दुर्गा माता दौड' काढली जाते. ही दौड अनेक वर्षांपासून काढली जाते. आयोजन केलं जातं. त्यावेळी झालेल्या प्रकारावर पोलिसांनी दखल घेत कारवाई केली. संशयित आरोपीला देखील ताब्यात घेतले आहे. असे असताना देखील रस्ता रोको करण्यात आला. याची काही आवश्यकता नव्हती. शहराला वेठीस धरायचं. महामार्ग अडवायचा. तिथं पोलिसांना देखील धक्काबुक्की करण्यात आली, हा सर्व प्रकार चुकीचा आहे. असे असले तरी पोलिस सतर्क आहेत. पोलिस प्रशासनाला सहकार्य करत अहिल्यानगरवासियांनी शांतता बाळगावी,' असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
'अहिल्यानगर शहरात तणाव निर्माण करणारे लोक ताब्यात घेतली गेली आहेत. परंतु आव्हान देणाऱ्या फलक लावणारे देखील लोक ताब्यात घेतली गेली पाहिजेत,' अशी मागणी आमदार जगताप यांनी केली.
'मुस्लिम जमावाने कोठला इथं रास्ता रोको केला. तिथं जमावाने तालुक्यातून आलेल्या, डोक्याला टिळा लावलेल्या मुलाला देखील मारहाण केली. हिंदू समाजामध्ये, असे घडत नाही. तिथंच काही दिवसापूर्वी गोमांस आढळलं होते. आम्ही आंदोलन केलं, त्यात विविध धर्माची लोक होती. पण कुठल्याही व्यक्तीला तिथं शिवी देण्यात आली नाही. आम्ही महाराष्ट्रभर मोर्चे-आंदोलनासाठी जातो, पण तिथे असं घडत नाही. परंतु जमावाने एका टिळा लावलेल्या हिंदू समाजाच्या मुलाला असं मारणं कितपत योग्य आहे. पोलिसांनी याबाबत देखील गुन्हा दाखल केला आहे,' असे आमदार जगताप यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.