Ahilyanagar Muslim violence : अहिल्यानगरमधील हिंसाचार, मुख्यमंत्र्यांना वेगळाच संशय; संग्राम जगताप आक्रमक भूमिकेत, 'आय लव्ह महादेव'चा नारा...

Ahilyanagar Violence Over I Love Muhammad Rangoli Sangram Jagtap Slogan & CM Devendra Fadnavis Response : अहिल्यानगरमधील मुस्लिम जमावाच्या हिंसाचाराची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असली, तरी आमदार संग्राम जगताप आक्रमक आहेत.
Ahilyanagar Muslim violence
Ahilyanagar Muslim violenceSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar communal tension : 'आय लव्ह मोहम्मद' रस्त्यावरील रांगोळीवरून अहिल्यानगरमधील मुस्लिमांचा जमाव आक्रमक करत रस्त्यावर उतरला. दीड तास रास्ता रोको आंदोलन करताना तेथून जाणाऱ्या ग्रामीण भागातील मुलाला, ज्याने डोक्याला टिळा लावला होता, त्याला मारहाण केली.

यानंतर आक्रमक झालेला मुस्लिम जमाव शहरात घुसण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांना दगडफेक सुरू केली. यातून उफाळलेल्या हिंसाचारावर राजकीय पडसाद उमटू लागले आहे. अहिल्यानगरमधील हिंसाचाराची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार संग्राम जगताप यावरून सुरूवातीपासून आक्रमक असून, त्यांनी 'आय लव्ह महादेव'चा नारा दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, "झालेल्या प्रकाराची माहिती घेत आहे. पण अहिल्यानगर शहरात वेगवेगळी फलक लागली जात आहे. यावरून त्यामागे काही कटकारस्थान आहे का? तिथं कोणी सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी प्रयत्न करतं आहे का? लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात वेगळं वातावरण निर्माण करण्यात आलं होतं. तसंच काही आता प्रकार होत आहे का? या सर्वांची चौकशी केली जाईल."

'सर्वांना आपपाल्या धर्मावर प्रेम करण्याचा अधिकार आहे. पण अशापद्धतीने लोकांमध्ये हिंसाचाराचे वातावरण तयार केले जा असेल, तर योग्य नाही,' असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. दरम्यान, या हिंसाचारप्रकरणी राष्ट्रवादी (NCP) आमदार संग्राम जगताप सुरूवातीपासून आक्रमक आहेत. त्यांनी आय लव्ह महादेवचा नारा दिला आहे.

Ahilyanagar Muslim violence
Hindu Muslim tension Ahilyanagar : 'आय लव्ह मोहम्मद' रस्त्यावर लिहिलं..; हिंदू-मुस्लिम वाद पेटला, शहरात घुसणाऱ्या मुस्लिम जमावावर 'लाठीचार्ज'

हिंसाचाराच्या घटना...

आमदार जगतापांनी 'आय लव्ह महादेव'चा नारा देताना, वेगवेगळी दाखले देत हिंसाचाराच्या घटनांवर बोट ठेवले. चार दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर "आय लव्ह मोहम्मद" बॅनर आणि घोषणांवरून मोठा गोंधळ झाला. बिहारीपूर पोलिस स्टेशनजवळील धार्मिक स्थळाबाहेर शेकडो लोकांनी निदर्शने करण्यायास सुरूवात केली. रस्त्यावर उतरून त्यांनी "आय लव्ह मोहम्मद" आणि "नारा-ए-तकदीर" असे नारे दिले. तसंच बॅनर फडकावल्याकडे लक्ष वेधले.

Ahilyanagar Muslim violence
I Love Muhammad controversy : 'आय लव्ह मोहम्मद' रांगोळीवरून वाद, अन् 'दुर्गा माता दौड', काय आहे कनेक्शन? संग्राम जगताप म्हणाले...

आमदार जगतापांनी काढले जुने मुद्दे

जमावातील काही लोकांनी पोलिसांवर हल्ला केल्यामुळे एकच गोंधळ उडाला. यानंतर पोलिसांना लाठीमार आणि अश्रुधुराच्या नळकांड्याचा फोडल्या. देशासह महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक वेळा, अशा घटना घडल्या आहेत. कोविड काळामध्ये संगमनेरपासून ते आता मागील काळात नागपूर इथं दंगलीपर्यंत पोलिसांना टार्गेट करण्यात आल्याकडे आमदार जगताप यांनी लक्ष वेधले.

'आय लव्ह महादेव'

आमदार संग्राम जगताप म्हणाले, "या विशिष्ट समाजाला कळले पाहिजे की, आपण हिंदुस्तानमध्ये राहतो. संस्कृती वेगळी आहे आणि या संस्कृतीमध्ये आपण काही वेगळेपणा दाखवण्याच्या प्रयत्न करणार असाल, तर याच्यावर कुठेतरी विचार करण्याची आवश्यकता आहे. देशात महादेव भक्त आहे, सर्वांच्या मनामध्ये महादेव असून 'आय लव्ह महादेव'चा नारा उठणारच."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com