Chhatrapati Shivaji Maharaj Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhatrapati Shivaji Maharaj statue vandalism : 'छत्रपतीं'च्या पुतळ्याची विटंबना; शिवप्रेमींनी महामार्ग रोखल्यानंतर बाजारपेठ बंद

Chhatrapati Shivaji Maharaj statue vandalism roadblock protest Ahilyanagar Rahuri : अहिल्यानगर राहुरी इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने शिवप्रेमींनी रस्ता रोको आंदोलन केले.

Pradeep Pendhare

Ahilyanagar Rahuri news : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या अवमानावरून राज्यात शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट असतानाच, अहिल्यानगर राहुरी इथं मोठा प्रकार घडला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ, हजारो शिवप्रेमींनी मनमाड महामार्ग रोखून धरला आहे. विटंबना करणाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवत, अटक करण्याची मागणी केली आहे. शिवप्रेमी आक्रमक होताच, स्थानिक राजकीय नेत्यांमध्ये देखील या घटनेवरून तीव्र येऊ लागल्या आहेत.

राहुरी शहरातील बुवा शिंदेबाबा तालीममध्ये असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना झाली. हा प्रकार दुपारच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकाराची माहिती शिवप्रेमींमध्ये पसरल्यानंतर तालीमभोवती गर्दी उसळली. जमाव आक्रमक होत असल्याने पोलिसांनी (Police) देखील आले.

शिवप्रेमी आक्रमक होत, तालीम परिसरातच घोषणाबाजी सुरू झाली. हा जमाव राहुरीतील (Rahuri) मनमाड महामार्गावर येत 'रास्ता रोको' सुरू केला. यानंतर राहुरीतील मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केली. पोलिसांनी परिस्थिती लक्षात घेऊन बंदोबस्तासाठी मोठा फौजफाटा रस्त्यावर उतरवत शांतता ठेवण्याचे आवाहन केले.

शिवप्रेमींनी महामार्ग अडवत आरोपीच्या अटकेची मागणी केली. तसेच आरोपींविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले देखील आंदोलनस्थळी दाखल झाले. रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या शिवप्रेमींशी संवाद साधला. तसेच तालमीची पाहणी केली.

दैवताची विटंबना खपवून घेणार नाही, खासदार लंकेंचा इशारा

खासदार नीलेश लंके यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला. या प्रकाराचा निषेध करतो. महाराष्ट्राच्या दैवताची विटंबना खपवून घेतली जाणार आहे. कुणी माथेफिरून केलेल्या या प्रकाराची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊ, त्याविरुद्ध कडक कारवाई करावी. छत्रपतींनी महाराष्ट्रात होत असलेल्या अवमानासंदर्भात केंद्रातील गृह खात्याचे लक्ष वेधणार असल्याचेही खासदार लंके यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT