Sanjay Raut Election Ticket Controversy : संजय राऊतांना विकत घेणारा पैदा व्हायचाय; उमेदवारी विकल्याच्या आरोपांवरून शिंदेंसेना अन् ठाकरेसेनेत जुंपली

Maharashtra Assembly Election controversy Thackeray ShivSena Eknath Shinde Sanjay Raut Ahilyanagar Parner Shrigonda assembly ticket : विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर शहर पारनेर श्रीगोंदा मतदारसंघाची उमेदवारी संजय राऊत यांनी विकेल्याच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आरोपांना ठाकरे शिवसेने जोरदार प्रत्युत्तर दिले.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पुरता धुव्वा उडाला. महायुतीला मोठं यश मिळालं. या अपयशानंतर महाविकास आघाडीतील पक्षातून नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची गळती लागली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला लागलेले गळती अजून थांबायला तयार नाही.

अहिल्यानगरमधील ठाकरे शिवसेनेचे सर्व नगरसेवकांनी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. आता शिंदेसेनेने खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करतांना विधानसभा निवडणुकीत धंदा केल्याचा आरोप केला. याला ठाकरेसेनेकडून जशास-तसे उत्तर देण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे म्हणाले, "विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगरमधून संदेश कार्ले, संभाजी कदम अन् मी स्वतः तिकिटाच्या रेसमध्ये होते. परंतु खासदार संजय राऊत यांनी तिकीट विकून धंदा केला. लोकसभा निवडणुकीला यश मिळाले. त्यानंतर ते हवेत गेले. त्यामुळे विधानसभेला धंदा करू, असे त्यांना वाटले".

Sanjay Raut
Beed Santosh Deshmukh Murder : फरार असताना कृष्णा आंधळेचा विष्णू चाटे अन् वाल्मिक कराडला तीनवेळा फोन; उज्ज्वल निकमांनी खटल्यावरची 'पक्कड' दाखवली

'श्रीगोंदा, पारनेर, अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी विकली. संजय राऊत (Sanjay Raut) यांना कंटाळूनच ठाकरेसेनेतील शिवसैनिक शिंदे यांच्या शिवसेनेत चालले आहेत. अहिल्यानगर शहर, पारनेर या शिवसेनेच्या जागा होत्या. ऐनवेळेला या जागा का बदलल्या? श्रीगोंद्यात काल आलेल्या एका महिलेला उमेदवारी दिली. त्यामुळे तिथं व्यवहार झाला नाही, तर काय झालं', असा सवाल बाळासाहेब बोराटे यांनी केला.

Sanjay Raut
Ajit Pawar News : पुरोगामी भूमिका जपताना होतेय अजितदादांची दमछाक!

राऊतांना शिंदेंसेनेने दिलं आव्हान

'संजय राऊत यांनी त्यांच्या आईच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यावी, आणि आम्ही विधानसभा निवडणुकीत व्यवहार केला नाही म्हणून सांगावे. तसं त्यांनी केले, तर आम्ही राजकारण सोडून देऊ', असे आव्हान देखील बाळासाहेब बोराटे यांनी खासदार राऊतांना दिले.

राऊतांना खरेदी करणारा पैदा व्हायचाय...

शिंदेसेनेने केलेल्या या आरोपाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे अहिल्यानगरचे शहरप्रमुख किरण काळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. शिवसेना आणि खासदार संजय राऊतांना विकत घेणारा, 'माई का लाल', या देशात अजून पैदा व्हायचा आहे, असा टोला लगावला. माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांची ही वक्तव्य राजकीय नैराश्यातून येत आहेत, असे काळे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com