Tanpure sugar factory election 1 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Tanpure sugar factory election : 'तनपुरे'साठी धुरळा उडणारच! जनसेवा अन् शेतकरी विकास भिडणार, विखे-कर्डिलेंची माघार

56 Candidates in Fray for Tanpure Sugar Factory Election in Ahilyanagar Rahuri : राहुरी इथल्या डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले.

Pradeep Pendhare

Tanpure sugar mill election 2025 : राहुरी इथल्या डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आज शुक्रवारी उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसाअखेर 173 पैकी 117 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.

बिनविरोधचे प्रयत्न फोल ठरले. दोन पूर्ण, एक अपूर्ण, असे एकूण तीन पॅनल आमने-सामने उभे ठाकले आहेत. विशेष म्हणजे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार शिवाजी कर्डिले यांनी भाजप महायुती पुरस्कृत विकास मंडळाच्या सर्व उमेदवारांना निवडणुकीतून माघार घेतली.

तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीसाठी चार पॅनल तयार झाले होते. परंतु मागील काही दिवसांपासून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू होत्या. भाजपचे (BJP) देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी पुढाकार घेऊन प्रयत्न केले. परंतु सर्व प्रयत्न फोल ठरले.

कारखाना बंद पडला आहे. तो पुन्हा चालू झाला पाहिजे. शेतकरी (Farmers), सभासद, कामगारांच्या हितासाठी कारखान्यात राजकारण नको, अशी भूमिका आमदार शिवाजी कर्डिले यांनी घेतली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार कर्डिले यांनी भाजप महायुती पुरस्कृत विकास मंडळाच्या सर्व उमेदवारांना निवडणुकीतून माघार घ्यायला सांगितले.

राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांचा जनसेवा मंडळ विरोधात राजूभाऊ शेटे यांचे शेतकरी विकास मंडळ, अशी समोरासमोर लढत होत आहे. त्यांच्यासमोर अमृत धुमाळ यांचे कारखाना बचाव कृती समितीचा अपूर्ण पॅनल उभा ठाकला आहे. येत्या सोमवारी (ता.19) चिन्ह वाटप, 31 मे रोजी मतदान, तर 1 जूनला मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे.

जनसेवा मंडळाकडून उत्पादक मतदार संघ : कोल्हार गट- अशोक उऱ्हे, ज्ञानेश्वर कोळसे. देवळाली प्रवरा गट- अरुण ढूस, कृष्णा मुसमाडे, भारत वारुळे. टाकळीमिया गट- मीना करपे, ज्ञानेश्वर खुळे, ज्ञानेश्वर पवार. आरडगाव गट- प्रमोद तारडे, वैशाली तारडे, सुनील मोरे. वांबोरी गट- किसन जवरे, भास्कर ढोकणे. राहुरी गट- अरुण तनपुरे, जनार्दन गाडे, तसेच 'ब' वर्ग सहकारी संस्था- हर्ष तनपुरे, अनुसूचित जाती-जमाती- अरुण ठोकळे, सपना भुजाडी, महिला प्रतिनिधी-जनाबाई सोनवणे, इतर मागासवर्ग- रावसाहेब तनपुरे, भटक्या जाती-विमुक्त जमाती- अशोक तमनर.

शेतकरी विकास मंडळकडून उत्पादक मतदारसंघ : कोल्हार गट- मच्छिंद्र कोळसे, गोरक्षनाथ घाडगे. देवळाली प्रवरा गट- गोरक्षनाथ चव्हाण, चंद्रकांत आढाव, गणेश मुसमाडे. टाकळीमिया गट- पोपट पोटे, चंद्रकांत पवार, सुभाष जुंदरे. आरडगाव गट- मधुकर तारडे, दत्तात्रेय म्हसे, दिनकर बानकर. वांबोरी गट- भास्कर सोनवणे, रावसाहेब गडाख. राहुरी गट- कैलास गाडे, नवनाथ कोहकडे, तसेच 'ब' वर्ग, सहकारी संस्था- रायभान काळे, अनुसूचित जाती जमाती- नामदेव झारेकर, महिला प्रतिनिधी- कौशल्याबाई शेटे, लीलाबाई येवले. इतर मागासवर्ग-सुरेश शिरसाठ, भटक्या जाती विमुक्त जमाती- अण्णा विटनोर.

कारखाना बचाव कृती समितीकडून

उत्पादक मतदारसंघ : देवळाली प्रवरा गट- अप्पासाहेब ढूस, सुखदेव मुसमाडे, सोमनाथ वाकडे. टाकळीमिया गट- सुधाकर शिंदे, संजय पोटे. आरडगाव गट- अरुण डोंगरे, अनिल कल्हापुरे. राहुरी गट- अरुण गाडे, सुभाष डौले, तसेच अनुसूचित जाती-जमाती- हरिभाऊ खामकर, महिला प्रतिनिधी-शैलजा धुमाळ, लताबाई पवार , इतर मागासवर्ग- दिलीप इंगळे. तर अपक्ष उमेदवार म्हणून उत्पादक मतदारसंघाच्या राहुरी गटात राधाकिसन येवले लढत आहेत.

31 मे रोजी मतदान

एकूण जागा : 21

जनसेवा मंडळ (उमेदवार) : 21

शेतकरी विकास मंडळ (उमेदवार) : 21

कृती समिती (उमेदवार) : 13

अपक्ष (उमेदवार) : 1

एकूण रिंगणातील (उमेदवार) : 56

मतदान : 31 मे रोजी

मतमोजणी : 1 जून

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT