Maharashtra political updates : अहिल्यानगरमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला चांगलीच गळती लागली आहे. नगर शहरातील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी मुंबईत जाऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
त्यानंतर आता नगर तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ठाकरे शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे. यानंतर ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी मेळावा घेऊन गद्दारांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
नगर तालुक्यातील ठाकरे शिवसेनेचे (Shivsena) जिल्हा उपप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, माजी सभापती रामदास भोर यांच्यासह पाच लोकांनी एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी मेळावा घेतला. यात त्यांनी गद्दारांवर घणाघात केला.
शशिकांत गाडे म्हणाले, "उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एकनाथ शिंदेसह 40 आमदार सोडून गेले, तेव्हा ठाकरेंना काहीच फरक पडला नाही. तर नगर तालुक्यातील पाच लोक ठाकरे शिवसेनेला सोडून गेल्याने काहीच फरक पडत नाही. उलट येणाऱ्या जिल्हा परिषदेत पंचायत समिती निवडणुकीत या गद्दारांना जागा दाखवून देऊ".
"या गद्दारांनी त्यांच्या वैयक्तिक अडचणींमुळे पक्ष सोडला आहे. मुंबईला पक्षप्रवेशासाठी गेले त्यावेळेस ते फक्त तीन गाड्या घेऊन गेले. कार्ले यांना जिल्हाप्रमुख पदही द्यायची मी तयारी दर्शवली होती. परंतु घरच्यांना विचारतो, असे कारण सांगून त्यांनी बगल दिला. दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य, एकदा सभापती, जिल्हा उपप्रमुख पद, अशी अनेक पदे देऊनही त्यांनी पक्षाशी गद्दारी केली. येणाऱ्या निवडणुकीत शिवसैनिक त्यांना जागा दाखवून देतील. मी त्यांचा पराभव केल्याशिवाय निवृत्ती घेणार नाही", असा घणाघात गाडेंनी केला.
शरद झोडगेंवर टीका करताना, नागरदेवळे गटात झोडगेंना जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली. लोकांची नाराजी असतानासुद्धा त्यांचा प्रचार केला. त्यांच्यासाठी गावागावात फिरलो. पण त्यांनीही पक्षाशी गद्दारी केली. मुळात ते पक्षाशी कधी एकनिष्ठ नव्हतेच, असा टोलाही गाडे यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.