Ahilyanagar Crime Update 1 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar Crime Update : अहिल्यानगर हादरलं; पोलिसाच्या भावाने युवतीच्या मानेत चाकू खुपसला, गंभीर जखमी युवतीच्या घरच्यांची 'चुप्पी', हल्ल्याचं गुढ वाढलं!

Ahilyanagar Savedi Policeman Brother Attacks Girl with Sharp Weapon Seriously Injured : अहिल्यानगर शहरातील सावेडी परिसरात एका युवतीवर युवकाच्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar Savedi attack : अहिल्यानगर शहरातील उच्चभ्रू म्हणून ओळखला जाणारा सावेडी भाग आज हादरला आहे. युवतीवर एकाने चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे. युवतीच्या मानेवर आणि हातावर वार झाल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू असून, तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

हल्लेखोर हा अहिल्यानगर शहर पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्याचा भाऊ आहे. विशेष म्हणजे, हल्लेखोर खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर होता, अशी माहिती अहिल्यानगर शहर पोलिसांकडून मिळाली.

सावेडी उपनगरातील पाऊलबुधे कॉलेज (College) इथं जखमी युवती शिक्षण घेते. गार्गी गणेश शिंदे (वय अंदाजे 16, रा. तपोवन रस्ता, सावेडी) असे जखमी युवतीचे नाव आहे. तिच्यावर भिस्तबाग परिसरात आज सकाळी चाकू हल्ला झाला. यात ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु मानेवर खोलवर जखमा असल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर तिथं शस्त्रक्रिया सुरू आहे. खोलवर जखम असल्याने शस्त्रक्रिया देखील गुंतागुंतीची असल्याचे सांगितले गेले.

या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिस (Police) ठाण्याचे आनंद कोकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा रुग्णालयात शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे, निरीक्षक कोकरे यांनी भेट देत, जखमी युवतीची पाहणी केली. यानंतर युवतीच्या नातेवाइकांशी चर्चा केल्यानंतर पुढील तपासाची चक्रे फिरवण्यात आली.

हल्लेखोराची गुन्हेगारी पार्श्वभूमी

हल्लेखोर हा पोलिस दलात कार्यरत असलेला पोलिस कर्मचाऱ्याचा भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्लेखोराची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी असून, त्याच्यावर पूर्वीच खुनाचा गुन्हा दाखल आहे. तो काही दिवसांपूर्वीच तुरूंगातून जामिनावर बाहेर आलेला आहे. हल्ला केल्यानंतर तो पसार झाला आहे. त्याच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी दिली.

जखमी युवतीच्या आईचे मौन

दरम्यान, जखमी युवतीच्या आई घटनेबाबत मौन बाळगून आहे. कोणतीही माहिती देण्यास ती तयार नाही. पोलिसांनी तक्रार मागितली, तर ती देखील द्यायला तयार नाही. त्यामुळे पोलिसांना घटनेसंदर्भात तक्रार घ्यायची कशी, असा प्रश्न पडला आहे. परंतु घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांकडून तक्रारीची तयारी करण्यात आली होती. हल्लेखोर हा खोली भाडे घेऊन राहतो, अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. पोलिसांनी त्या खोलींची देखील पाहणी केली.

युवती अन् हल्लेखोराचा एकाच वाहनावर प्रवास

पोलिस निरीक्षक आनंद कोकरे म्हणाले, "हल्लेखोराची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी प्रवृत्ती आहे. जखमी युवती ही त्याच्या वाहनावर आली होती. या दोघांचा संबंध काय, हे कळू शकलेले नाही. त्यानंतर त्याने 15 मिनिटांनंतर तिच्यावर हल्ला केला. युवतीच्या हातावर अन् मानेवर वार केले. हल्ल्यात चाकूसारखे धारदार शस्त्र वापरले गेलेले आहे." जखमी युवतीची आई फिर्याद द्यायला तयार नाही, असेही कोकरे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT