Shani Shingnapur cyber crime : ऑनलाइन शनिदेवाची पूजेतील अॅप घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अहिल्यानगर सायबर शाखेचं पथक अन् शनिशिंगणापूर पोलिसांनी देवस्थान परिसराची पाहणी करून स्थळ पंचनामा केला.
सलग चार तास चाललेल्या पंचनामा भेटीमुळे ग्रामस्थं अन् परिसरातील वातावरण ढवळून निघालं.
तीन दिवसांपूर्वी विधिमंडळात आमदार विठ्ठल लंघे व आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी लक्षवेधीमध्ये कर्मचारी भरतीमधील भ्रष्टाचार व शनिदेवाच्या ऑनलाइन पूजेच्या माध्यमातून झालेल्या अॅप घोटाळ्याचा प्रश्न उपस्थित केला. शनैश्वर देवस्थानला फिर्यादी होण्याच्या सूचना देऊन देखील टाळाटाळ केली. शेवटी सायबर सेलनं फिर्याद दाखल करत प्रत्यक्ष तपास सुरू केला आहे.
चार तास इन कॅमेरा सर्व दिशा, तसेच स्थळांचा पंचनामा सुरू असताना कुतूहल म्हणून ग्रामस्थं आजूबाजूला थांबून माहिती घेण्याचा प्रयत्न करीत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लक्षवेधीला उत्तर देताना कडक कारवाईचे संकेत दिल्यानं गावात पोलिसांचा फौजफाटा येताच चर्चेला उधाण आले होते.
सोशल मीडियावर शनैश्वर देवस्थान ट्रस्ट बरखास्त, कारवाई सुरू आदी अफवा पसरली होती. मंदिर व जनसंपर्क कार्यालय परिसरात नेहमी चमकणारे विश्वस्त दोन दिवसांपासून दिसत नसल्याने सर्वांचीच घाबरगुंडी उडाली असल्याची चर्चा ग्रामस्थांच्या तोंडून ऐकण्यास मिळाली.
पोलिस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर आवश्यक बाबी पूर्ण करण्यासाठी आज तपासाचा भाग म्हणून मंदिर परिसराचा पंचनामा करून दिशांची पाहणी करण्यात आली. फिर्यादीत पाच अॅप कंपन्या, तसेच त्यांचे मालक व साथीदारांवर गुन्हा दाखल केल्याचे सांगितले.
शुक्रवार (ता.11) विधानभवनात लक्षवेधीमध्ये आमदार विठ्ठल लंघे यांनी अॅप घोटाळ्याचा विषय मांडला. लक्षवेधीच्या उत्तरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाईचा इशारा दिला.
शनिवार(ता.12) सायबर शाखेच्या वतीने शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल
रविवार (ता.13) विश्वस्त मंडळाची अधिकाऱ्यासह बैठक, विश्वस्त मंडळातील सदस्यांची स्वतंत्र एकमेकांत चर्चा.
सोमवार (ता.14) तपासी अधिकारी मोरेश्वर पेंदाम यांच्यासह सायबर शाखा व शनिशिंगणापूर पोलिस पथकाने देवस्थान परिसराचा स्थळ पंचनामा केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.