Shivaji Maharaj statue issue Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivaji Maharaj statue issue : महाराज माफी आसावी! बडदे, ओगले, ससाणेंसह शिवप्रेमींचं आत्मक्लेष..

Ahilyanagar Shrirampur Shiv Sena UBT, Congress Protest Over Shivaji Maharaj Statue : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा श्रीरामपूर शहरातील शिवाजी चौकात बसवू शकलो नाही म्हणून, श्रीरामपूरमधील राजकीय नेत्यांनी आत्मक्लेष आंदोलन करत माफी मागितली.

Pradeep Pendhare

Ahilyanagar Shrirampur protest : श्रीरामपुरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा शिवाजी चौकात न बसवता भाजी मंडईसमोर बसवून त्याबाबतचा लोकार्पण सोहळा उद्या (रविवारी) आयोजित केला आहे. त्याचा निषेधासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख सचिन बडे यांनी आत्मक्लेष आंदोलन केलं.

शिवप्रेमीसह श्रीरामपूर तालुक्याचे आमदार हेमंत ओगले, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, सुधीर नवले, डॉ. वंदना मुरकुटे, अहमदभाई जहागिरदार यांनी आंदोलनात हजेरी लावली. श्रीरामपूर नगरपालिकेतील महाराजांच्या पुतळ्यासमोर मौन ठेवून आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले.

शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण दोन तारखेला भाजी मंडई या ठिकाणी होणार आहे. हा पुतळा शिवाजी चौकात बसवायचा होता. पण तो आम्ही बसवू शकलो नाही. त्यात आम्ही श्रीरामपूरकर कमी पडलो. म्हणून छत्रपती शिवरायांची माफी मागण्यासाठी नगरपालिकेच्या आवारामध्ये आत्मक्लेश आंदोलन केले." या आंदोलनाला सुरूवात करताच, श्रीरामपूरमधील शिवप्रेमी, शिवसैनिक व श्रीरामपुरातील नागरिक सहभागी झाल्याचे बडदे यांनी सांगितले.

'लोकसभेच्या (Loksabha) वेळी स्वतः रामगिरी महाराज यांच्या हस्ते चौकामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा भूमिपूजन झाले. मग ते काय फक्त खासदारकी पुरते होते की, काय? त्यानंतर आज पुन्हा एकदा नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजी मंडई या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे. ते पण पूर्ण राजकीय असून जनभावनेचा जी मागणी आहे, त्याला पूर्ण विरोध करून फक्त बहुमताच्या आणि सत्तेच्या जोरावर भाजी मंडई या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित होत आहे. हा सर्व जनतेच्या भावनेचा खेळवाड आहे,' असा घणाघात सचिन बडदे यांनी केला.

'दिवंगत नेते जयंतराव ससाणे यांनी भाजी मंडई, या ठिकाणी त्याचवेळी परवानगी दिली होती. पण जनभावना त्या ठिकाणी पुतळा बसवण्यास अनुकूल नव्हती. त्यामुळे त्यांनी कधीही तो निर्णय जनतेवर लादला नाही किंवा रेटला नाही. आज ते असं सांगत आहे की चौकामध्ये पुतळा बसण्यास अडचण आहे. पण हे साफ खोटे आहे,' असेही सचिन बडदे यांनी म्हटले.

'श्रीरामपूरच्या बेलापूर रोडवरील डावखर चौक या ठिकाणचा जागा एकदम छोटी, असताना त्या ठिकाणी एक पुतळा आणि चौक सुशोभीकरण करण्यात आले आहे. एका बाजूला वेगळा नियम अन्, दुसऱ्या बाजूला वेगळा, असं कसं होऊ शकते? त्यामुळे या सर्व गोष्टी जनतेच्या समोर याव्यात, आणि शिवप्रेमींना याची माहिती व्हावी, म्हणूनच आत्मक्लेष आंदोलन करत महाराजांची माफी मागितली,' असे सचिन बडदे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT