Ahilyanagar Property Tax Hike Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar Property Tax Hike : दुहेरी फटका! कर वाढीला विरोध, पगार रखडले; कर्मचारी युनियनचा नगरसेवकांना थेट इशारा

Municipal employees demand salary clearance by recovering dues from corporators opposing water and property tax hike in Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिका कर्मचाऱ्यांचा दोन महिन्यांपासून पगार थकल्याने कर्मचारी युनियन महापालिका प्रशासनाविरोधात आणि कर वाढीला विरोध करणाऱ्या नगरसेवकांविरोधात आक्रमक झाली आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar municipal corporation news : अहिल्यानगर महापालिका दुहेरी संकटात सापडलं आहे. नगरसेवकांनी मालमत्ता आणि पाणीपट्टी कर वाढीला विरोध दर्शवला आहे. तर दुसरीकडे दोन महिन्यांपासून रखडलेल्या पगारावरून महापालिका युनियन कर्मचारी आक्रमक झाली आहे.

वेतनासाठी थेट काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहेत. तसंच महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कर रचनेची पुनर्रचनेची मागणी केली आहे. कर वाढीला विरोध करणाऱ्या नगरसेवकांच्या मालमत्तेतून वसुली करावी, अशी थेट मागणी कर्मचारी युनियनने केल्याने खळबळ उडाली आहे.

अहिल्यानगर महापालिका (Municipal) कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी व मार्च महिन्यांचे पगार अद्याप न झाल्यामुळे कर्मचारी आर्थिक संकटात सापडलेत. यावरून मनपा कर्मचारी युनियनने तीव्र भूमिका घेतली आहे. सोमवारपर्यंत पगार न झाल्यास काम बंद आंदोलनचा इशारा युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

युनियनचे अध्यक्ष जितेंद्र सारसर व सचिव आनंद वायकर यांनी सांगितले की, सुरवातीला फक्त पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग सुरू ठेवण्यात येईल; मात्र त्यानंतरही पगार न झाल्यास या अत्यावश्यक सेवाही बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ते पुढे म्हणाले, "अहिल्यानगर (Ahilyanagar) शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला असताना, उत्पन्न वाढीसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात नाहीत. साधारणपणे दहा वर्षांतून एकदा कर रचना पुनर्रचना होणे अपेक्षित असते; मात्र तसे होत नसल्याने महापालिकेची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे."

नगरसेवकांकडून अडथळे

युनियनने नगरसेवकांवरही टीका करत म्हटले, "काही नगरसेवक पाणीपट्टी व घरपट्टी कमी करण्याची मागणी करत आहेत. जे लोक उत्पन्न वाढीला विरोध करतात, तेच व्यवस्थेला अडथळा ठरत आहेत. हे म्हणजे कुंपणच शेत खात असल्यासारखे आहे."

नगरसेवकांच्या मालमत्तेतून वसुली करा

महापालिकेचा मोठा खर्च दिवाबत्ती, पाणीपुरवठा व इतर मूलभूत सेवांवर होत असून, उत्पन्न घटल्यास या सेवांवर परिणाम होणार हे स्पष्ट आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन, पेन्शन तसेच इतर देणी प्रामुख्याने जीएसटी अनुदानातून भागवली जात असल्याने, आर्थिक ताण अधिक वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. याच पार्श्वभूमीवर, जर एखाद्या नगरसेवकाने पाणीपट्टी व घरपट्टी वाढीला विरोध केला, तर त्याच्या मालमत्तेतूनच वसुली करण्यात यावी, अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात येणार असल्याचे युनियनने स्पष्ट केले आहे.

कर वाढीसाठी युनियनचा इशारा

तसेच, महापालिकेने तब्बल 23 वर्षांनंतर घरपट्टी व पाणीपट्टी वाढवली असून, जर यामध्ये पुन्हा कपात करण्याचा दबाव आणला गेला, तर युनियन न्यायालयात जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे. एकूणच, पगाराचा प्रश्न आणि कररचनेवरील वाद यामुळे महापालिकेत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, येत्या काही दिवसांत परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT