Ram Shinde BJP Vs Rohit Pawar NCP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ram Shinde BJP Vs Rohit Pawar NCP : अनेकांचे मनसुबे धुळीस; तरीही राम शिंदे अन् रोहित पवार धुरळा उडवणार

Karjat BJP Ram Shinde vs NCP Rohit Pawar in Ahilyanagar ZP Election : कर्जत तालुक्यातील राजकीय धुरिणांचे लक्ष लागलेल्या पाच जिल्हा परिषद गट आणि दहा पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर झाले आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar Zilla Parishad election : कर्जत तालुक्यातील राजकीय धुरिणांचे लक्ष लागलेल्या पाच जिल्हा परिषद गट आणि दहा पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर झाले आहे. यामध्ये अनेकांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. येथील पंचायत समितीचे चापडगाव गणातील व्यक्ती मिनी मंत्रालय अर्थात, पंचायत समितीच्या सभापतिपदी वर्णी लागणार, हे निश्चित झाले आहे.

इच्छुकांची संख्या अधिक असल्याने दोन्ही बाजूचे नेते सभापती प्रा. राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांची चांगलीच दमछाक होणार आहे. कार्यकर्ते अन् पदाधिकाऱ्यांची नाराजीनाट्य अधिक रंगणार असल्याचे स्थानिक विश्लेषणकांचे म्हणणे आहे.

जिल्हा परिषदेच्या पाच गटांत आणि पंचायत समितीच्या दहा गणांत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यासह महाविकास आघाडी आणि विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेंसह महायुती, असा सामना रंगणार आहे. दोन्ही गटांकडे इच्छुकांची संख्या अधिक असून, उमेदवार निश्चित करताना आमदार पवार आणि सभापती प्रा. शिंदे यांची दमछाक होणार आहे.

सभापतिपदाचे आरक्षण (Reservation) जाहीर झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी चुप्पी साधली असल्याने संभ्रम असून, आता गट आणि गणांतील आरक्षण निश्चित झाल्याने कुणाला तयारीला लागा आणि कुणाला काम कराचा संदेश येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अनेक वर्षांपासून येथील पंचायत समितीत प्रशासकराज होते. त्यामुळे तालुक्यातील मिनी मंत्रालय आणि त्याकडे राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा काहीसा कानाडोळा होता. मात्र अनेकांना सभापतिपद खुणावत होते. अखेर काही दिवसांपूर्वी येथील सभापतिपदाची सोडत निघून ते इतर मागास व्यक्तीसाठी जाहीर झाले.

त्यालगोलग आज पाच जिल्हा परिषद गट आणि दहा पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. तित मिरजगाव जिल्हा परिषद गट सर्व साधारण पुरुषासाठी आरक्षित असून, त्या गटातील दोन्ही गण महिलेसाठी आरक्षित झाले आहेत. मिरजगाव गण खुल्या प्रवर्गातील महिला, तर कोंभळी गण अनुसूचित महिलेसाठी आरक्षित झाला आहे.

महिला राज दिसणार

कर्जत तालुक्यातील चापडगाव जिल्हा परिषद गटात आणि गणात महिला राज येणार आहे. जिल्हा परिषद गटाचे आरक्षण सर्व साधारण महिलेसाठी आरक्षित असून, चापडगाव गण इतर मागास व्यक्तीसाठी, तर टाकळी खंडेश्वरी गणातील आरक्षण खुल्या प्रवर्गातील महिलेला निश्चित झाले आहे. तसंच कुळधरण जिल्हा परिषद गट नागरिकांच्या मागास प्रवर्गसाठी आरक्षित असून, त्यातील कुळधरण आणि दूरगाव गण पुरुषासाठी खुले आहेत.

राशीन गटात उलथापालथ

बहुचर्चित कोरेगाव जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण महिला आरक्षण असून, त्या गटातील कोरेगाव गणासाठी ओबीसी महिला, तर चिलवडी गण खुल्या प्रवर्गातील खुल्या महिलेसाठी जाहीर झाला आहे. राशीन जिल्हा परिषद गटात बरीच उलथापालथ झाली असून, येथील नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव आरक्षण असून, राशीन आणि भांबोरा हे दोन्ही खुले आरक्षित आहेत.

गणनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे

कोंभळी - अनुसूचित जाती महिला, दूरगाव - सर्वसाधारण पुरुष, राशीन - सर्वसाधारण पुरुष, टाकळी खंडेश्वरी- सर्वसाधारण महिला, कुळधरण- सर्वसाधारण पुरुष, कोरेगाव- ओबीसी महिला,मिरजगाव- सर्वसाधारण महिला, भांबोरा- सर्वसाधारण पुरुष, चिलवडी- सर्वसाधारण महिला, चापडगाव- ओबीसी पुरुष

जिल्हा परिषद गटातील आरक्षण

मिरजगाव- (सर्व साधारण पुरुष), चापडगाव- (सर्व साधारण महिला), कुळधरण- (नागरिकांचा मागास प्रवर्ग), कोरेगाव- (सर्व साधारण महिला) आणि राशीन (नागरिकांचा मागास प्रवर्ग).

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT