Congress on Raj Thackeray : राज ठाकरेंच्या मनात आहे, पण काँग्रेस नाही म्हणतीय... : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा 'पंजा'ने अडकवली?

Thackeray brothers alliance News : गेल्या काही दिवसापासून राज-उद्धव ठाकरे यांच्या वाढत्या जवळीकतेमुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना व मनसे युतीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.
Raj Thackeray, sharad pawar, rahul gandhi, uddhav thackeray
Raj Thackeray, sharad pawar, rahul gandhi, uddhav thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल आता कोणत्याही क्षणी वाजू शकते. त्यामुळे राज्यभरातील सर्वच पक्षाकडून निवडणुकीची तयारी सुरु आहे. महायुती एकत्रित लढण्याच्या भूमिकेत दिसत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता दिसून येत नाही. एकीकडे राज-उद्धव ठाकरे बंधूंची युती होण्याची शक्यता आहे. त्यावेळी राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार का ? उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडीच्या बाहेर पडणार? असा सवाल केला जात आहे.

गेल्या काही दिवसापासून राज-उद्धव ठाकरे यांच्या वाढत्या जवळीकतेमुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना व मनसे युतीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. मात्र, या दोन भावाच्या युतीच्या घोषणेला काँगेसचा अडसर ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या हिंदी सक्तीच्या विरोधात राज व उद्धव ठाकरे बंधू एकत्रित आले होते. त्या विरोधात दोन्ही भाऊ एकत्र येऊन मुंबईत मोर्चा काढणार होते. मात्र, मुंबईतील मोर्चा काढण्याआधीच महायुती सरकारने हिंदी सक्तीच्या विरोधात काढलेले दोन्ही जीआर मागे घेतले होते. त्यामुळे ठाकरे बंधूनी मोर्चा ऐवजी वरळीतील डोममध्ये विजयी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळेस पासून आतापर्यंत गेल्या तीन महिन्याच्या काळात ठाकरे बंधू जवळपास सहावेळा ऐकत आले आहेत. त्यामुळे या दोन पक्षामध्ये आता राजकीय दृष्ट्या एकत्र येण्यावरून चर्चा सुरु आहेत.

Raj Thackeray, sharad pawar, rahul gandhi, uddhav thackeray
BJP local seats conflict : महायुतीत पहिली ठिणगी: 'स्थानिक'साठी भाजपला एकही जागा देणार नाही; अजितदादांचा आमदार आक्रमक

राज (Raj Thackeray) व उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मातोश्री व कृष्णकुंज या दोघांच्या निवासस्थानी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात उद्धव ठाकरे यांची शिवसेना व मनसे युतीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. या दोन्ही पक्षादरम्यान गेल्या काही दिवसात जागावाटपाची बोलणी सुरु आहे. गेल्या काही दिवसातील दोन्ही नेत्याचा चर्चेचा सूर पाहिला तर लवकरच या दोन्ही पक्षाच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Raj Thackeray, sharad pawar, rahul gandhi, uddhav thackeray
Baba Siddiqui mystery : बाबा सिद्दीकींची 'मर्डर मिस्ट्री' सुटेना : वर्षभरात 27 जण गजाआड, पण पोलिसांना मास्टरमाईंड सापडेना!

काँग्रेसमुळे अडले युतीचे घोडे

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील संभाव्य राजकीय युतीची चर्चा सध्या जोरदार आहे. दोन्ही बंधूंनी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत अनेकदा दिले आहेत, वारंवार भेटीगाठीही होत आहेत. मात्र, त्यांच्या युतीचे 'घोडं' महाविकास आघाडीमधील महत्त्वाचा पक्ष असलेल्या काँग्रेसमुळे अडले असल्याची चर्चा जोरात आहे.

Raj Thackeray, sharad pawar, rahul gandhi, uddhav thackeray
Mahayuti Politics : रवींद्र धंगेकरांची कानउघडणी, भाजप नेत्यांवर आरोप केल्याने एकनाथ शिंदे नाराज

मनसेच्या भूमिकेकडे लक्ष

गेल्या काही दिवसापासून राज ठाकरे यांची महाविकास आघाडी सोबतची जवळीकता दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्थ पाठिंबा दिला होता. एवढेच नव्हे तर ते भाजपच्या प्रचार करताना सुद्धा दिसले. मात्र, त्या निवडणुकीत त्याचा राज ठाकरेंना अथवा भाजपला त्याचा काहीच फायदा झाला नाही. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी महायुती व महाविकास आघाडीशी समान अंतर ठेवत स्वबळावर निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. तर अमित ठाकरे यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला एकही जागा मिळाली नाही, अमित ठाकरे यांना सुद्धा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे आता वर्षभरातच होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात काय भुमिका घेणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Raj Thackeray, sharad pawar, rahul gandhi, uddhav thackeray
Yogesh Kadam Tweet: फडणवीसांचा घायवळ प्रकरणावर मोठा खुलासा; योगेश कदमांचं काही वेळातच सूचक ट्विट; म्हणाले,'छोटी मोठी वादळं...'

राज ठाकरेंची आघाडीसोबतची जवळीकता वाढली

गेल्या काही दिवसापासून त्यांची महाविकास आघाडीसोबतची त्यांची जवळीकता वाढताना दिसत आहे. काँग्रेसकडून बिहार निवडणुका तोंडावर असल्याने मनसेपासून सुरक्षित अंतर ठेवले जात आहे. त्यामुळेच त्यांनी परप्रांतीय नागरिकांसोबतची भूमिका आता सौम्य केली आहे. त्याशिवाय मुस्लिमविरोधी भूमिका देखील घेताना दिसत नाहीत. या सर्व कारणामुळेच गेल्या काही दिवसापासून राज ठाकरेंची आघाडीसोबतची वैचारिक जवळीकता वाढल्याचे दिसत आहे.

Raj Thackeray, sharad pawar, rahul gandhi, uddhav thackeray
Sanjay Raut on Raj Thackeray : राज ठाकरेंची काँग्रेसला सोबत घेण्याची इच्छा, संजय राऊतांनी फेकला नवा चेंडू

'या' कारणामुळे काँग्रेसचा मनसेला सोबत घेण्यास विरोध

काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सुरुवातीपासूनच राज ठाकरे यांच्या 'मनसे'च्या धोरणांवर आक्षेप घेतला आहे. मनसेची भूमिका अनेकदा 'अ-मराठी' किंवा 'परप्रांतीय विरोधी' राहिली आहे. त्याशिवाय उत्तर भारतीय मतदारांचे गणित महत्त्वाचे आहे. मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये काँग्रेसला उत्तर भारतीय आणि इतर भाषिक मतदारांची मोठी साथ आहे. मनसेला युतीत घेतल्यास हा मतदार वर्ग काँग्रेसपासून दुरावेल, अशी भीती काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना आहे.

Raj Thackeray, sharad pawar, rahul gandhi, uddhav thackeray
BJP Politics : भाजप निष्ठावंतांना धक्का, 'इन्कमिंग 'वाल्यांना लॉटरी! वरिष्ठांनी फडणवीसांसमोर मांडलेल्या भूमिकेने कोंडी

'मविआ'च्या अस्तित्वाचा प्रश्न

काँग्रेसचे काही नेते उघडपणे बोलले आहेत की, उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसोबत युती केल्यास, महाविकास आघाडीचे स्वरूप बदलेल आणि काँग्रेससाठी या आघाडीत राहणे कठीण होईल. त्यामुळे येत्या काळात 'मविआ'चे 'ध्रुवीकरण' टाळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मनसेला सोबत घेण्यास उत्सुक नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना 'मविआ' आणि 'राज ठाकरे युती' यापैकी एकाची निवड करावी लागेल, अशी परिस्थिती आहे.

Raj Thackeray, sharad pawar, rahul gandhi, uddhav thackeray
Nilesh Ghaywal Case : 'बॉसशी काय बोलता धंगेकरांशी बोला...', म्हणत एकाकी पडलेल्या शिंदेंच्या नेत्याच्या मदतीला धावला शरद पवारांचा 'हा' आमदार

'ठाणे पॅटर्न'चा उदय

त्यातच ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्या ठिकाणी ठाणे पॅटर्न उदयास येत आहे. याठिकाणी काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना व मनसे एकत्रित येण्याची चर्चा सुरु आहे. याबाबत ठाण्यात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि ठाकरे गटाच्या नेत्यांसोबतच्या मनसेच्या बैठकीने या चर्चांना दुजोरा दिला आहे. तर दुसरीकडे ठाण्यात मनसे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एकत्रित येऊन महापालिकेवर मोर्चा काढला आहे. त्यामुळे मनसे महाविकास आघाडीसोबत येणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Raj Thackeray, sharad pawar, rahul gandhi, uddhav thackeray
Ravindra Dhangekar : पोलिसांनी पाच कोटी पकडले, रवींद्र धंगेकर गंभीर आरोप करत म्हणाले, 'त्या' गाडीत शहाजीबापुंची माणसं

आघाडीच्या शिष्टमंडळात मनसेचे प्रमुख राज ठाकरे

निवडणूक आयोगाच्या भेटीला राज्यातील महाविकास आघाडीचे नेते जाणार आहेत. त्याच वेळी या शिष्टमंडळासोबत मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे देखील जाणार आहेत. त्यामुळे त्यांची ही वाढती जवळीकता येत्या काळात मनसे महाविकास आघाडीसोबत जाण्यास उत्सुक आहे का ? अशी चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे येत्या काळात मनसे-ठाकरेंची शिवसेना यांची युती झाली तर मनसेला सोबत घेण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील असल्याचे समजते. त्यामुळे आता यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार यांना दिल्ली दरबारी वजन वापरून काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीला राजी करावे लागणार आहे.

Raj Thackeray, sharad pawar, rahul gandhi, uddhav thackeray
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना पश्चाताप; शिदेंच्या बंडावर पहिल्यांदाच सर्वात मोठं विधान; म्हणाले,'...तर शिवसेना फुटलीच नसती!'

काँग्रेसचा विरोध हीच राजकीय अडचण

काँग्रेसची मुंबईत सोमवारी बैठक पार पडली. त्या बैठकीत मनसेला आघाडीत घेण्यास स्थानिक काँग्रेस नेत्याने विरोध केला आहे. त्यांच्या विरोधामुळेच मनसे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना युतीच घोषणा रखडली आहे. काँग्रेसच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी मनसेला सोबत घेण्यास हिरवा कंदील दर्शवला तर या दोन पक्षाच्या युतीची घोषणा लवकरच होऊ शकते. राज आणि उद्धव ठाकरे यांची युती निश्चित मानली जात असली तरी, महाविकास आघाडी टिकवायची असेल तर काँग्रेसला सोबत घेणे उद्धव ठाकरेंसाठी आवश्यक आहे. त्यामुळे काँग्रेसचा विरोध हीच युतीतील प्रमुख 'राजकीय अडचण' ठरत आहे.

Raj Thackeray, sharad pawar, rahul gandhi, uddhav thackeray
NCP Politic's : अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या सातारा जिल्हाध्यक्षांना भलताच कॉन्फीडन्स; केला ‘हा’ दावा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com