Ahmednagar Congress
Ahmednagar Congress  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Congress : नगर काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलच्या अध्यक्षपदी थोरात समर्थकाची वर्णी !

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar Politics : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे सुमारे पावणे दोन महिन्यांच्या कालावधीनंतर सोमवारी (दि.13 फेब्रुवारी) संगमनेर येथे आले. त्यानंतर आज मंगळवारी अहमदनगर (Ahmednagar) काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष किरण काळे (Kiran Kale) यांच्या नेतृत्वाखाली थोरातांची भेट घेतली.

तसेच शहर व जिल्ह्यातील राजकीय घडामोडींबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नियुक्तीचे पत्र अनिस चुडीवाला यांना थोरात यांच्या हस्ते देण्यात आले.

यानंतर काळे म्हणाले की, ''जिल्ह्यातील काँग्रेस एकसंघ आणि मजबूत आहे. कुणी कितीही हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला तरी थोरात यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची घोडदौड आगामी काळात देखील सुरू राहील. पक्ष संघटन अधिक मजबूत केले जाईल. निवडणुकांच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम केले जाईल.''

''कार्यकर्त्यांनी संभ्रमात राहू नये. खांद्याला खांदा लावून पक्ष विस्ताराचे काम करावे. थोरातांची तब्येत आता चांगली असून ते उद्याच्या मुंबईच्या प्रदेश काँग्रेसच्या बैठकीतही सहभागी होणार आहेत'', असं ते म्हणाले. तसेच या बैठकीत काळे देखील त्यांच्या समवेत सहभागी होणार असल्याचेही ते म्हणाले.

अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदी चुडीवाला

शहर जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी अनिस चुडीवाला यांची अल्पसंख्यांक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगडी यांच्या मान्यतेने वक्फ बोर्डाचे चेअरमन तथा अल्पसंख्यांक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष वजाहत मिर्झा यांनी नियुक्ती मुंबईतून जाहीर केली.

थोरातांच्या मान्यतेने आणि काळे यांच्या शिफारशीने ही निवड करण्यात आली. यापूर्वी या पदावर अजूभाई शेख हे कार्यरत होते. मात्र आता त्यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेण्यात आली असून चुडीवाला यांची या पदी वर्णी लागली आहे.

जिल्हा काँग्रेसची लवकरच होणार महत्वाची बैठक

थोरातांशी झालेल्या चर्चेनंतर बोलताना काळे यांनी जिल्हा काँग्रेसची (Congress) लवकरच बैठक थोरातांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित केली जाणार असल्याचे सांगितले. तसेच यावेळी काँग्रेसच्या 'हाथ से हाथ जोडो अभियान' आणि संघटनात्मक कामांचा आढावा घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील, नगर तालुका काँग्रेसचे ॲड.अक्षय कुलट, जिल्हा खजिनदार मोहन वाखुरे, उपाध्यक्ष अशोक शिंदे, सरचिटणीस स्वप्निल पाठक आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT