Ahmednagar Legislative Council election Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Legislative Council election : विधान परिषदेसाठी 461 मतदार ठरले? नगराध्यक्षांचे ‘डबल वोटर’ प्रकरण चर्चेत, तर 'कॅन्टोन्मेंट' सदस्य मतदार यादीत!

Draft voter list released for Ahmednagar Local Authorities Constituency MLC election; 461 voters eligible to cast votes Ahilyanagar : अहमदनगर विधान परिषद मतदार यादी जाहीर प्रारूप यादी प्रसिद्ध होताच जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग; 26 मे रोजीपर्यंत हरकती, तर 30 मे रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra Legislative Council Election : अहमदनगर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील महापालिका, छावणी परिषद, नगरपरिषद आणि नगरपंचायतींतील लोकनियुक्त नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच स्वीकृत सदस्यांचा या यादीत समावेश करण्यात आला असून, एकूण 461 मतदारांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे.

विशेष म्हणजे, जामखेडच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा (Nagaradhyaksha) प्रांजल चिंतामणी या नगराध्यक्षा तसेच नगरसेविका म्हणून निवडून आल्याने त्या दुहेरी मतदार (Voter) ठरत होत्या. मात्र, नियमानुसार त्यांना एकदाच मतदान करता येणार आहे.

तसेच भिंगार इथल्या अहिल्यानगर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे स्वीकृत नगरसेवक वसंत राठोड यांचाही मतदार यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यांचे नाव केंद्र सरकारच्या (Central Government) यादीत असल्याने त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे.

संस्थांतील सदस्य मतदार

अहिल्यानगर महापालिका : 73

संगमनेर : 34

कोपरगाव : 34

राहाता : 23

श्रीरामपूर : 39

राहुरी : 28

देवळाली प्रवरा : 24

पाथर्डी : 23

श्रीगोंदे : 25

शिर्डी : 26

शेवगाव : 28

नेवासे : 20

कर्जत : 19

अकोले : 18

जामखेड : 27

पारनेर : 19

अशा एकूण 461 मतदारांचा समावेश अंतिम यादीत अपेक्षित आहे.

मतदानासाठी केंद्र

अहिल्यानगर महापालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि नेवासा नगरपंचायत : अहिल्यानगर

संगमनेर आणि अकोले : संगमनेर

शिर्डी, राहाता आणि कोपरगाव : राहाता

राहुरी, देवळाली प्रवरा आणि श्रीरामपूर : श्रीरामपूर तहसील कार्यालय

श्रीगोंदे आणि पारनेर : अहिल्यानगर

कर्जत आणि जामखेड : कर्जत

शेवगाव आणि पाथर्डी : पाथर्डी

अशी मतदान केंद्रांची विभागणी करण्यात आली आहे.

हरकतींसाठी 26 मे रोजीपर्यंत मुदत

मतदार यादीवरील हरकती आणि दावे दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयांमध्ये विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

हरकतींसाठी : फॉर्म क्रमांक 7

दाव्यांसाठी : फॉर्म क्रमांक 17

हरकती आणि दावे दाखल करण्याची अंतिम मुदत 26 मे रोजी असून, त्यावर सुनावणी झाल्यानंतर 30 मे रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गिते यांनी दिली.

राजकारणाला वेग

विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. मतदार यादी जाहीर होताच संभाव्य उमेदवार, गटबाजी आणि राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली असून, आगामी काळात या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT