Ajit Pawar Dead: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नाशिक यांचे राजकीय ऋणानुबंध होते. अनेक नेत्यांचा उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी थेट संपर्क होता. त्यामुळे आजच्या दुर्घटनेने जिल्ह्यातील सर्वच आमदार सुन्न झाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक सात आमदार आहेत. बारामती धावपट्टीवर विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याने उपमुख्यमंत्री पवार यांचे निधन झाले. वृत्ताने जिल्ह्यातील सर्वच आमदार सुन्न झाले आहेत.
देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी या वृत्ताने आपल्याला धक्का बसला आहे, असे सांगितले. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भगूर येथे उपमुख्यमंत्र्यांची सभा झाली होती. त्यावेळी त्यांनी आमदार अहिरे यांचे कौतुक केले होते.
यासंदर्भात आमदार अहिरे प्रतिक्रिया व्यक्त करताना निशब्द झाल्या. त्या अक्षरशः ओक्सा बोक्सी रडल्या. त्यांना शब्दही फुटत नव्हता. यावेळी पक्षाचे विक्रम कोठूळे, जगदीश पवार व अन्य पदाधिकाऱ्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत उमेदवार असल्याने त्यांच्याशी उफमुख्यमंत्री पवार यांनी संवाद साधला होता.
त्या म्हणाल्या, तुझ्यासारख्या सामान्य आमदाराला त्यांनी विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला. माझ्या पाठीशी उभे राहिले. अडचणीच्या काळात नेहमीच ते मदतीला येत असत. त्यांच्या निधनाने आम्हाला पोरके झाल्यासारखे वाटते आहे.
ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ हे मुंबईत होते. मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक असल्याने बहुतांशी आमदारही मुंबईत होते. उपमुख्यमंत्र्यांच्या अपघाताची बातमी करताच यातील बहुतांशी आमदार बारामतीकडे रवाना झाले आहेत.
आमदार सर्वश्री माणिकराव कोकाटे, हिरामण खोसकर, नितीन पवार, दिलीप बनकर यांचं अन्य पक्षाचे आमदारही उपमुख्यमंत्री पवार यांच्या निधनाने सुन्न झाले. अर्थ खात्याच्या माध्यमातून बहुतांशी आमदारांचा उपमुख्यमंत्र्यांशी संपर्क होता. जिल्ह्यातील सर्वच राजकीय नेत्यांना याचा धक्का बसला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.