Ajit Pawar on Bhagur water supply scheme News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज (रविवार) भगूर पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन झाले. तत्पूर्वी शिवसेनेचे स्थानिक नेते विजय करंजकर यांनी श्रेय वादावरून आक्षेप घेतला होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांच्या या कार्यक्रमाची विशेष चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सरोज अहिरे यांच्या मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आज झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा कार्यक्रम केला. यावेळी मतदारसंघातील पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
तत्पूर्वी भगूरचे माजी नगराध्यक्ष आणि सध्या शिवसेनेत असलेले विजय करंजकर यांनी या कार्यक्रमाला आक्षेप घेतला होता. भगूर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी आम्ही पाठपुरावा केला होता. शिवसेना(Shivsena) मंत्र्यांनी त्याला प्रतिसाद दिल्यामुळेच योजना मंजूर झाली. या योजनेच्या भूमिपूजनाबाबत शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी घेतलेल्या आक्षेपाचा विषय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका शब्दात मिटवला. अशा विषयांना फारसे महत्त्व दिले जाऊ नये असे ते म्हणाले.
ते म्हणाले, महायुतीचे(Mahayuti) राज्यात २३७ आमदार आहेत. ज्या पक्षाचा आमदार असेल त्या पक्षाच्या मतदारसंघातील विकासकामाचे भूमिपूजन अथवा उद्घाटन त्या पक्षाचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी करायचे, असा संकेत निश्चित झाला आहे. आमदार सरोज अहिरे या आमच्या पक्षाच्या आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात हा कार्यक्रम होत आहे. त्यामुळे भूमिपूजन मी करणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) म्हणाले याविषयी फारच वाद झाल्यास मी मुंबईत गेल्यावर परवा मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे मला भेटतील मी त्यांना सांगेन की भगूर येथील योजनेचे भूमिपूजन मी केले आहे ते म्हणतील हरकत नाही, यातून कुठलाच वाद निर्माण होण्याची शक्यता नाही. आम्ही त्यासाठी प्रयत्न केले असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या आमदार त्याचे श्रेय घेतात असा आक्षेप त्यांनी नोंदविला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आभार दौऱ्याच्या सभेत देखील त्याचा विशेष उल्लेख केला होता.
याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी मात्र एका शब्दात विजय करंजकर यांचा विषय मिटवला. ते म्हणाले, श्रेय कोण घेत आहे. हे फारसे महत्त्वाचे नाही. मूळ प्रश्न भगूरच्या नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणार आहे, हा आहे. त्यामुळे महत्त्व कशाला द्यायचे हे नागरिकांनी ठरवावे. उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते भगूर पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन होणार असल्याच्या जाहिराती आज झळकल्या त्यानंतर शिवसेनेचे नेते करंजकर यांनी या विषयावरून चांगलाच वाद घातला होता. या कामाचे श्रेय कोणाचे यावरून त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांवर टीका केली होती मात्र उपमुख्यमंत्री पवार यांनी करंजकर यांचा विषय एका शब्दांत मिटवल्याने करंजकर यांच्या हाती विषय राहिला नाही.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.