Chandrashekhar Bavankule Politics: बावनकुळेंचा ट्वीस्ट; महापालिका निवडणुकांत महायुती एकसंघच, मात्र...

Chandrashekhar Bavankule; Mahayuti will contest elections together, but both options are open-भाजप नेते बावनकुळे यांनी महापालिका निवडणुकांत महायुती एकत्र की स्वतंत्र ही उत्सुकता वाढवली.
Chandrashekhar Bavankule & Eknath shinde
Chandrashekhar Bavankule & Eknath shindeSarkarnama
Published on
Updated on

Mahayuti News: विधानसभा निवडणुकीच्या निकालांमुळे महायुतीच्या नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. महाविकास आघाडी गोंधळलेली आहे. त्याचा पूर्ण फायदा महायुतीने घेण्याचे ठरविले आहे.

राज्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून जोरदार इनकमिंग सुरू आहे. त्यासाठी महाविकास आघाडीच्या विविध पक्षांना सेज लावली आहे. त्यामुळे भाजपला शिंदे यांनी परस्पर काटा काढल्याचे समाधान मिळत आहे. त्यात दुहेरी डाव तर दडलेला नाही ना? अशी स्थिती आहे.

Chandrashekhar Bavankule & Eknath shinde
Chandrashekhar Bavankule Politics: बावनकुळे यांची सारवासारव, " धस, मुंडे यांच्यात तडजोड झालीच नाही"

या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी महापालिका जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुती एकसंध राहील. एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे जाईल. महायुतीला राज्यभरात विधानसभा निवडणुकीसारखेच मोठे यश मिळेल असा दावा केला आहे.

Chandrashekhar Bavankule & Eknath shinde
Uddhav Thackrey Politics: शिवसेनेचा इशारा, महायुतीने तो निर्णय न घेतल्यास राज्यातील जिल्हा बँका संकटात जाणार...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकसंघ राहील. हे सांगतानाच, बावनकुळे यांनी दुसरा पर्याय देखील खुला ठेवला आहे. ते म्हणाले, ज्या ठिकाणी तुल्यबळ उमेदवार एकमेकांसमोर असतील, तिथे मैत्रीपूर्ण लढती देखील होऊ शकतील.

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने भाजप सह प्रतिस्पर्धी पक्षांच्या अनेक माजी नगरसेवकांना पक्षात सामील केले आहे. शिवसेना शिंदे पक्षाचा आक्रमक विस्तार विचारात घेता हा पक्ष स्वबळावर निवडणुकीची तयारी करीत आहे. त्यामुळे महायुती एकसंघ राहणार की स्वतंत्रपणे निवडणुका करणार हा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. त्यात मंत्री बावनकुळे यांनी आणखी भर टाकली, असेच म्हणता येईल.

महायुतीला विधानसभेत भक्कम संख्याबळ आहे. मात्र तरीही हा पक्ष अन्य पक्ष फोडण्यावर आपली सर्व ताकद पणाला लावीत आहे. यामागे कोणते राजकीय रहस्य दडले आहे. याची नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना ही उत्सुकता आहे त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न बावनकुळे यांनी तर केला नाही ना?.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com