Sharad Pawar, Uddhav Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar Politics : उद्धव ठाकरे, शरद पवार मुंबईत सत्याच्या मोर्चात व्यस्त, नाशिकमध्ये अजित पवारांनी साधली संंधी..

Nashik Politics : आतापर्यंत महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना व भाजपमध्येच नाशिकमध्ये सर्वांधिक इनकमिंग झाले. पंरतु आता राष्ट्रवादीतही इनकमिंग झाल्याने कार्यकर्त्यांच्या पंखात बळ भरले आहे.

Ganesh Sonawane

Nashik Politics : महाविकास आघाडी आणि मनसेने निवडणूक आयोगाविरोधात काल मुंबईत काढलेल्या सत्याच्या मोर्चात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्दव ठाकरे व राष्ट्रवादी शरचंद्रपवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हेही सहभागी झाले होते. काल दिवसभर याच मोर्चाची चर्चा होती. पवार, ठाकरे मोर्चात व्यस्त असताना मात्र अजित पवार यांनी डाव साधला.

नाशिकमधील नाशिकरोड परिसरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील काही कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि. १) राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला. नाशिकमध्ये भाजप व शिवसेना(शिंदे गट) पाठोपाठ आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही इनकमिंग सुरु झाल्याने आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांच्या पंखात बळ भरले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडला. पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचे संजय कोठुळे, आत्माराम आढाव तसेच रोहित मते (नाशिक तालुका उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्ष), मनोज ठाकरे (कार्याध्यक्ष, शिवजन्मोत्सव सोहळा समिती, नाशिकरोड), समाधान कोठुळे (शाखा प्रमुख, शिवसेना शिंदे पक्ष), संतोष कोठुळे (विभाग प्रमुख, शिवसेना शिंदे गट), सचिन भांगरे (शिवसैनिक, उबाठा) आणि धीरज बोडके (शिवसैनिक, उबाठा) आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे.

दरम्यान या प्रवेश सोहळ्यामुळे शिवसेना शिंदे पक्ष, ठाकरे पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांना एक प्रकारे नाशिकरोडला खिंडार पडले आहे. या प्रवेशामुळे नाशिकरोड परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाली असून स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. याप्रसंगी ज्येष्ठ नेते निवृत्ती अरिंगळे, विक्रम कोठुळे, माजी नगरसेवक जगदीश पवार, व्यापारी बँकेचे संचालक गणेश खर्जुल आदी उपस्थित होते.

दरम्यान नाशिकमध्ये भाजपने फार आधीच शंभर प्लसचा नारा दिला आहे. शिवसेना शिंदे गटानेही स्वबळाची तयारी केली आहे. त्यासाठी दोन्ही पक्षात यापूर्वी मोठे इनकमिंग झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT