Yeola Municipal Election : येवल्यात राष्ट्रवादीची नगराध्यक्षपदापर्यंतची तयारी सुरु, पंकज-समीर भुजबळ लागले कामाला

Chhagan Bhujbal : नगराध्यक्षपदाचा निर्णय मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते घेतला जाईल अशी माहिती यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली.
MP Sameer Bhujbal during interviews of NCP aspirants for the upcoming Yeola Municipal Election
MLA Pankaj Bhujbal and former MP Sameer Bhujbal during interviews of NCP aspirants for the upcoming Yeola Municipal ElectionSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal : येवला नगराध्यक्ष पदाचा निर्णय मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते घेतला जाईल. तसेच येवला शहराच्या विकासासाठी सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.

आमदार पंकज भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांनी आज येवला नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) कडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. तसेच यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नगरपालिका निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, उपाध्यक्ष दत्ता निकम, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, शहराध्यक्ष दिपक लोणारी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

MP Sameer Bhujbal during interviews of NCP aspirants for the upcoming Yeola Municipal Election
Nashik ZP Election : उदय सांगळे, सुनीता चारोस्करांनी कमळ हाती घेण्याआधीच तुतारी वाजली, दोघांना एकाचवेळी दणका

येवला नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार समीर भुजबळ यांनी आज येवला शहरातील एकूण १३ प्रभागात इच्छुक असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शेकडो सक्षम उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या. यावेळी इच्छुक उमेदवारांकडून येवला शहराच्या विकासाच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण कल्पना, उपक्रम आणि योजना जाणून घेण्यात आल्या.

MP Sameer Bhujbal during interviews of NCP aspirants for the upcoming Yeola Municipal Election
Nashik Election : नाशिक गटात आजी-माजी आमदारांच्या वारसांमध्ये तगडी लढत होणार ; आदिवासी महामंडळ निवडणुकीचे चित्र स्पष्ट !

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यक्षम, प्रामाणिक आणि लोकाभिमुख उमेदवारांची निवड करण्यावर भर देण्यात आला आहे. या बैठकीदरम्यान “येवल्याच्या विकासासाठी योग्य त्या उमेदवारांना संधी द्यावी”, अशी मागणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली. त्यावर मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते निर्णय घेतला जाईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान येवला तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट व पंचायत समितीचे दहा गण आहेत. या निवडणुकीत मंत्री छगन भुजबळ यांची भूमिका अत्यंत महत्वाची असणार आहे. जातीय समीकरणांचा प्रभाव येवल्यात दिसून येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com