Ink attack on Vikas Lawande : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विकास लवांडे यांच्यावर आळंदी इथं संग्रामबापू भंडारे आणि त्यांच्या समर्थकांनी केलेल्या शाई फेक प्रकरणाचा राज्यभरात निषेध होत असतानाच, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी समर्थन केलं आहे.
आमदार जगताप यांनी समर्थन करताना, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. आमदार जगताप यांच्या या भूमिकेनं वारकरी संप्रदायात खळबळ उडाली आहे.
आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) म्हणाले, "संग्रामबापू भंडारे यांचे अभिनंदन अन् समर्थनही करतो. अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने आपल्याने भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यांनी जे काही काळ फासलं, ते करताना त्यांची भूमिका देखील लक्षात घेतली पाहिजे. आपल्या धर्माची पताका घेऊन जात असताना, या लोकांनी आपलं संपूर्ण जीवन धर्माकरिता, पांडुरंगासाठी, प्रभू रामचंद्रांसाठी आपलं जीवन समर्पित केलं आहे."
'कुणीतरी उठतो, जो पक्ष कुठेच नाही, कशातच नाही, कुणीतरी त्याचा माणूस उठतो, त्यालाही कुणी खात नाही, तो उठून ,असा काही यादी वाचतो, तसं काय कुठला अधिकार, कुणीतरी शासकीय अधिकार दिला. एखादा इन्कम टॅक्सचा अधिकारी असेल, पोलिस आयुक्त आहे, तो अशापद्धतीने यादी वाचतो, तसं काही, गुन्हेगारांची यादी वाचतो, असं काम केलं,' असा घणाघात आमदार जगताप यांनी केला.
संग्रामबापू भंडारे यांनी जे केलं आहे, ते हिंदुत्ववादी (Hindutva) कार्यकर्ते म्हणून केलं आहे. यासाठी त्यांचं संबंध महाराष्ट्र, सकल हिंदू समाजाच्यावतीने अभिनंदन करतो. योग्य अशी भूमिका बापूंनी बजावली आहे. हे लोकं बोलणारे आहेत, त्यांना धर्माबद्दल कोण बोलायला लावतं. विरोधात कोण बोलायला लावतं, या लोकांचा चेहरा देखील समोर येणं गरजेचं आहे, असेही संग्राम जगताप यांनी म्हटलं.
भविष्यात कुणी पुन्हा साधू-संतावर असं काही बोलत असतील, तर हा इशारा आहे. संग्रामबापूंनी व्यक्तिगत नाव घेतलं म्हणून हा प्रकार केलेला नाही. ते ज्यांना आदर्श मानतात, यातून त्यांच्या भावना दुखवल्या गेल्या अन् त्यांनी अशापद्धतीने निषेध केला, असे सांगत आमदार जगताप यांनी समर्थन केलं.
सूरज चव्हाण यांनी विकास लवांडे यांचा बोगस वारकरी म्हणून उल्लेख करत त्यांच्यावर बंदी आणावी, अशी मागणी केली आहे. संग्रामबापू भंडारे जेवढे बोगस हभप आहेत, विकास लवांडे सुद्धा तेवढेच बोगस हभप आहेत. अशा लोकांमुळे वारकरी सांप्रदाय बदनाम होत आहे. सर्वसामान्य जनेतचा विश्वास असेलेल्या वारकरी सांप्रदायला राजकीय अड्डे बनवू नका. विश्वस्तांनी दोघांवर बंदी आणावी, अशी मागणी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.