Varkari Controversy Maharashtra :'माझा खून कराल, पण सत्य दडवणार कसं?'; शरद पवारांच्या शिलेदाराचा एल्गार, वारकरी संप्रदायासाठी ‘आरपार’ लढाई!

Vikas Lawande reiterates names of 20 ‘infiltrator’ Maharajs, launches sharp attack on BJP, Sanatan, and ‘Manuwadi’ ideology : वारकरी संप्रदायात सत्ताधारी भाजपकडून घुसखोर घडवून आणलेल्या २० महाराजांची नाव जाहीर करणारे शरद पवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते विलास लवांडे अधिक आक्रमक झाले आहेत.
Vikas Lawande
Vikas LawandeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Varkari Sampraday controversy : महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील "प्रतिगामी" आणि "धर्मांध" विचारांच्या लोकांची घुसखोरीवर चिंता व्यक्त करता, भाजप सत्ताधाऱ्यांकडून टीका झाली. यानंतर शरद पवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी एक पाऊल पुढे टाकत, वारकरी संप्रदायातील, 20 साधू-महंतांची नावे जाहीर केली.

यावरून राज्यातील सत्ताधारी अन् विलास लवांडे यांच्यात वाद उफळला आहे. पण विकास लवांडे आपल्या भूमिकेवर ठाम असून, 'कितीही धमक्या द्या, शिव्या द्या, खून करा, पण सत्य दडवणार कसं? जेलमध्ये टाका, वकील देणार नाही, जामीन घेणार नाही, तुरुंगात बसून राहील,' असा निर्धार व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी त्यांच्या 'एक्स' खात्यावर व्हिडिओ शेअर करत, वारकरी संप्रदायातील मनुवादी, धर्मांध घुसखोरीवर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. या घुसखोरांची 20 नावे पत्रकार परिषदेत जाहीर केली. पैठणच्या धर्मपीठाला संत ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी प्रश्न विचारलेलं आवडलं नव्हतं. त्यांचा संताप उसळून यायचा. इस्लाम असो किंवा इतर कुठल्याही धर्माला प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. आता सनातन वैदीक धर्माला प्रश्न विचारलेले आवडत नाही, असे लवांडे यांनी म्हटलं आहे.

'सनातन धर्माला वर्ण वर्चस्ववाद इथं रूजवायचा आहे. 'ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र', असा हा वाद इथं पुन्हा रुजवायचा आहे. वारकऱ्यांचा (Varkari) संतांचा 'रामकृष्ण हरी' मंत्र पुसून तिथं 'जय श्रीराम' मंत्र रुजवायचा आहे. अशा पद्धतीच्या सनातनला आम्ही जाब विचारतच राहणार. धर्मांध, प्रतिगामी विचारांना संतांच्या विचारात आम्ही घुसखोरी करून देणार नाही,' अशी स्पष्ट भूमिका विकास लवांडे यांनी मांडली.

Vikas Lawande
Rahuri Bypoll Political Twist : मुख्यमंत्री आले, आभार मानले अन् निघून गेले; पण तनपुरेंचा ‘भगवा टायमिंग’ गेम कितपत यशस्वी? राजकारणात नवा ट्विस्ट!

जीवे मारण्याच्या धमक्या

'मला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. धारकरी असतील, भास्कर गिरी आणि रामगिरी महाराजांचे लोकं गेल्या चार दिवसांपासून फोन करून प्रचंड त्रास देत आहेत. या धारकऱ्यांकडून, अंधभक्तांकडून माझ्या जीविताला धोका आहे, हे महाराष्ट्र सरकारनं लक्षात घ्यावं,' असेही विकास लवांडे यांनी म्हटलं आहे.

Vikas Lawande
Maharashtra Education Scam : शिंदे शिवसेनेकडे असलेल्या शिक्षण विभागात गोंधळाचा स्फोट! सत्यजीत तांबेंचा संताप अन् आता आंदोलनाचा अटळ इशारा!

वारकऱ्यांकडून भूमिकेचं स्वागत

'वारकरी संप्रदायातील घुसखोरीचं सर्वसामान्य वारकऱ्यांकडून स्वागत केलं आहे. कोणीही निषेध केलेला नाही. जे निषेध करत आहेत ते, भाजप, विश्व हिंदू परिषद, संभाजी भिडे यांचे धारकरी आहेत. हिंसेला आम्ही घाबरत नाही. जीवाला धोका आहे, याला देखील घाबरत नाही,' असे विकास लवांडे यांनी म्हटलं आहे.

मूळ संतांचा अवमान न करण्याचं आवाहन

'वारकरी संप्रदायात मूळ 36 संत आहेत. त्यांचा अवमान करू नका. वारकरी संप्रदायातील लोकांना आवाहन करताना, मूळ संतांचा अपमान होऊ न देण्यासाठी, इतर कोणालाही संत म्हणू नका. वारकऱ्यांना दिलेल्या पाठिंब्याचे आम्ही स्वागत करतो अन् आभार देखील मानतो,' असेही विकास लवांडे यांनी म्हटलं आहे.

सत्याग्रह मार्गाने लढा सुरूच ठेवणार

'माझ्यावर दाखल गुन्ह्यांची शहानिशा करावी. माझी लढाई थांबणार नाही. वकील देणार नाही, जामीन देणार नाही, दंड देणार नाही, महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहानुसार माझा लढा सुरूच राहील. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आवरावं, मनुवादी वृत्तीचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत,' असाही इशारा विलास लवांडे यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com