Sharad Pawar NCP News: शरद पवारांच्या पक्षातील प्रवक्त्यावर शाही फेक! जीवे मारण्याची धमकी

Ink Attack on Sharad Pawar NCP Spokesperson Vikas Lawande: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. घटनेनंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
Ink Attack on Sharad Pawar NCP Spokesperson Vikas Lawande
Ink Attack on Sharad Pawar NCP Spokesperson Vikas LawandeSarkarnama
Published on
Updated on

Pune News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाही फेकत त्यांना धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. वारकरी संप्रदायातील आणि गोरक्षक असलेल्या तरुणांनी आपल्यावर हा जीवघेणा हल्ला केला असल्याचा आरोप विकास लवांडे यांनी केला आहे. या हल्लेखोरांकडं पिस्तूलही होते, असा दावा त्यांनी केला आहे.

याबाबत लवांडे म्हणाले, "आज सकाळी मातोबाची आळंदी तालुका हवेली येथे माझं एका दशक्रियेच्या निमित्ताने प्रवचन होतं. ते प्रवचन संपल्यानंतर दहा वाजता मी आळंदी मातोबाची येथून पुण्याला जायला निघालेलो असताना रस्त्यात, गावाच्या बाहेर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही १०-१५ गोरक्षक, दोन-तीन गाड्यासह आले त्यांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं. माझी गाडी अडवून मला उतरवून माझ्या अंगावर दोन-तीन शाईच्या बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली आणि दोघा जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते. ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते.

Ink Attack on Sharad Pawar NCP Spokesperson Vikas Lawande
Tamil Nadu Crisis : CM पदाचं समीकरण सोडवणाऱ्या थलपती विजय यांना 10 वीत गणिताने फोडला होता घाम!

तेवढ्यात लोक जमत असताना ते मात्र लगेच पळून गेले. मी त्या सर्वांचा निषेध करतो. संग्राम भंडारे आणि त्याच्यासोबत आलेले सगळे जे काही १०-१५ गुंड होते, गाड्या घेऊन आलेले, त्यांच्यावर पोलिसांनी तत्काळ कायदेशीर कारवाई करावी, असे लवांडे यांनी म्हटलं आहे.

Ink Attack on Sharad Pawar NCP Spokesperson Vikas Lawande
PMC News: पुणे महापालिकेत ‘माझा प्रभाग-माझा माणूस’ पॅटर्न? कार्यकर्त्यांच्या पुनर्वसनावरून नवा वाद

लवांडे यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे माझा सत्याग्रह सुरू राहणारच असल्याचं लवांडे यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com