Ajit Pawar NCP Vs BJP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar NCP Vs BJP : नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलली; अजितदादांचा शिलेदार संतापला, निषेधाबरोबरच भाजपला 'खोडा पार्टी' म्हटलं!

Ajit Pawar NCP Leader Ashutosh Kale Criticizes BJP After Kopargaon Municipality Election Postponed : कोपरगाव नगरपालिकेची पुढे ढकलण्यावरून अजित पवार राष्ट्रवादीकडून घेतलेल्या निषेध सभेवर भाजपवर जोरदार टीका करण्यात आली.

Pradeep Pendhare

Kopargaon municipality election : नगरपालिकेची निवडणूक ढकलण्यावरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आशुतोष काळे चांगलेच संतापले आहे.

या प्रवृत्तीचा निषेध करत, भाजपला 'खोडा पार्टी', असे म्हटलं आहे. कोपरगाव इथं निषेध करत सभा घेत, निवडणूक ठरलेल्या वेळापत्रकानुसार घ्यावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव, देवळाली, नेवासा आणि पाथर्डी या चार ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबद्दल न्यायालयात (Court) असलेल्या अपिलामुळे नगरपरिषद निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. याबरोबरच सात नगरसेवक पदाच्या उमेदवाराबाबत हा निर्णय लागू करण्यात आला असून, तिथं देखील मतदान प्रक्रिया पुढे गेली आहे. आता नगरपरिषद आणि नगरसेवक पदाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये 10 डिसेंबरपर्यंत माघार घेण्याची मुदत, तर 20 डिसेंबरला मतदान आणि 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने (Election Commission) न्यायालयात अपिल केलेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी सुधारित आदेश लागू केला आहे. यात कोपरगाव नगरपालिकेा समावेश आहे. निवडणूक पुढे गेल्यावरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आशुतोष काळे चांगलेच संतापले असून, त्यांनी कोपरगाव इथं निषेध सभा घेतली.

आमदार आशुतोष काळे म्हणाले, "राज्य निवडणूक आयोगाने जो काही आदेश दिला आहे, तो विरोधी पक्ष भाजपने न्यायालयात अपिल दाखल केल्यामुळे लागू झाला आहे. सर्वप्रथम मी त्या विरोधी पक्षाचा निषेध करतो. समोरची पार्टी म्हणजे 'खोडा पार्टी' आहे." प्रत्येक गोष्टीमध्ये खोडा घालत आहे. ही त्यांची प्रवृत्तीच आहे. यांना शहर विकासाचे काहीही देणेघेणे नाही. फक्त लोकांना वेठीस धरायचे, लोक अडचणीत राहिले पाहिजेत. त्या अडचणीतून हे राजकारण करतात, असा घणाघात केला.

'कोपरगावमधील पाच नंबर साठवण तलावाला स्थगिती मिळावी, म्हणून न्यायालयात त्यांनी 36 तारखा लावल्या. यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून पाच नंबर साठवण तलाव थांबावा. कोपरगाव नगरपालिकेमध्ये सभागृहामध्ये विरोधी ठराव घेऊन काम थांबवण्याचे प्रकार करायचे. न्यायालयात जाण्याचे प्रकार करायचे. आता दोन दिवसांनी होऊ घातलेल्या निवडणुकीत, त्यांना कळून चुकलेला आहे की, जनता आता त्यांच्याबरोबर राहिलेली नाही. त्यांची पूर्ती वाळू संपलेली आहे छाननीच्या दिवशी कोणतीही हरकत न घेता न्यायालयात आपिल केलं आहे. उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी केली. न्यायालयीन देखील त्यांना तिथे नाकारलं,' असं आमदार काळे यांनी म्हटले.  

'हे अपिल न्यायालयात दाखल केलं नसतं, तर आज या गोष्टी झाल्या नसत्या. या निवडणुकीला पुढे ढकलण्यामध्ये कोण जबाबदार असेल, तर ती विरोधी पार्टी भाजप आहे. पुन्हा या ठिकाणी मी त्यांचा निषेध करतो. कायम शहरांमध्ये लोकांना वेठीस धरलं जात आहे. जनतेच्या न्यायालयात न जाता दरवेळीस राजकारण केलं जात आहे. तरी आम्ही प्रयत्न करत आहोत की, कोपरगावला तरी निवडणूक प्रक्रिया पुढे चालावी. मतदानाच्या दिवशीच मतदान प्रक्रिया व्हावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आज जर निकाल या संदर्भात लागला नाही, तर राज्य आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार निवडणुकीला सामोरे जाऊ,' असं आमदार काळे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT