Manikrao Kokate illness Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manikrao Kokate illness : माणिकराव खरंच आजारी असते, तर राष्ट्रवादीचे लोकं 'पार्ले बिस्किट'चा पुडा..! सुषमा अंधारेंनी एकही मारा पर साॅलिड मारा!

Ajit Pawar NCP Nashik Manikrao Kokate Illness Sushma Andhare Criticises CM Fadnavis in Shirdi Ahilyanagar : उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या आजारपणावर शिवसेना ठाकरे पक्षाच्या सुषमा अंधारे यांनी प्रश्न उपस्थित केले.

Pradeep Pendhare

Sushma Andhare criticism : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाठराखण अन् माजी मंत्री आमदार माणिकराव कोकाटे यांचे अटक वाॅरंट असून देखील कायदेशीर कारवाई होत नसल्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्याकडे असलेल्या गृह खात्यावर निशाणा साधला.

'माजी मंत्री माणिकराव कोकाटे खरंच आजारी असते, तर राष्ट्रवादीचे लोकं पार्ले बिस्किटचा पुडा घेऊन गेले असते,' असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.

सातारा इथल्या अंमली पदार्थ प्रकरणात, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नातेवाईक असल्याचा चर्चा होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून याप्रकरणी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुढं येत, एकनाथ शिंदे यांची पाठराखण केली.

'उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) किंवा त्यांच्या कुटुंबियांचा सातारामधील अंमली पदार्थ प्रकरणात कोणताही सहभाग नाही. पोलिसांनी केलेल्या तपासात आतापर्यंत कोणताही पुरावा आढळला नाही. विरोधकांनी केवळ राजकीय स्वार्थापोटी सातारा अंमली पदार्थ प्रकरणात शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत,' असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी शिंदेंना क्लीन चिट दिली.

एकनाथ शिंदे यांना अंमली पदार्थाच्या प्रकरणात ओढलं जात आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणत आहे, यावर सुषमा अंधारे यांनी, त्यांना कोण ओढतं आहे. मी स्वच्छ शब्दात सांगत आहे की, मी त्यांना गुन्हेगार म्हणत नाही, राजकीय संरक्षण मिळता कामा नये, उपमुख्यमंत्र्‍यांचा भाऊ म्हटलं की लोकं घाबरतात. लोकं बातमी द्यायला घाबरतात, लोकं तपासाला घाबरतात, असे म्हटलं आहे.

माणिकरावांना अटक का नाही?

पाॅलिटिकल प्रिव्हिलेज मिळता कामा नये हे सांगताना, सुषमा अंधारे यांनी, बघा ते माणिकराव कोकाटे बसले आहेत तिथे, माणिकराव कोकाटे खरंच आजारी असते, तर राष्ट्रवादीचे सगळे लोकं गेले असते त्यांच्याकडे, 'पार्ले बिस्किट'चा पुडा घेऊन! कोणी गेलं नाही. म्हणजे माणिकराव कोकाटे आजारी नाहीत. समजा एक मिनिटासाठी ते आजारी आहेत, असे म्हटलं, 'मेडिकल अरेस्ट' दाखवता येते, पण ती दाखवली का? तर नाही दाखवली, असे म्हणत गृहमंत्रालयाच्या कारभारावर टीका केली.

गृहमंत्रालयाची अस्वस्था, दात नसलेला वाघ

'कालपासून पोलिस अरनेस्टसाठी थांबले आहेत. अजून का अटक नाही? असा सवाल करत, देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस ही लाजिरवाणी आणि केविलवाणी गोष्ट आहे, गृह मंत्रालयाची अवस्थता तुम्ही दात नसलेल्या वाघासारखी करून टाकलेली आहे. कशाला बोलायला भाग पडता आम्हाला,' असा टोलाही सुषमा अंधारे यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT