Manikrao Kokate Arrest : कोकाटेंपर्यंत पोहोचले नाशिकचे पोलिस; अटकेची कारवाई सुरू, मात्र...

Nashik police reached Manikrao Kokate : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या न्यायालयाने दोन वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
Manikrao Kokate arrest latest update
Manikrao Kokate arrest latest updateSarkarnama
Published on
Updated on

Manikrao Kokate Latest News : मंत्रिपद गमावलेल्या माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. नाशिकचे पोलिस अटक वॉरंट बजावण्यासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहे. रुग्णालयाबाहेर माध्यमांचा गराडा आहे.

माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या न्यायालयाने दोन वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षामुळे कोकाटे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता त्यांना अटक करण्यासाठी पोलिस रुग्णालयात दाखल झाले आहेत.

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे आमदार माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाली. नाशिकच्या कनिष्ठ स्तर दहाव्या न्यायालयाने त्यांच्या अटकेचा अजामीन पात्र वॉरंट बजावला आहे. त्यामुळे पोलिसांना आमदार कोकाटे यांना अटक करणे भाग आहे.

पोलिस (Police) आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार दहा कर्मचारी आणि तीन अधिकारी,असा 13 जणांचे पोलिस पथक मुंबईला रवाना झाले. गुरुवारी मुंबईला गेलेले हे पथक सकाळी लीलावती रुग्णालयात पोहोचले. यावेळी अधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी अटकेबाबत चर्चा केली.

Manikrao Kokate arrest latest update
Bhaskar Jadhav Opposition Leader : विरोधी पक्षनेतेपदासाठी कोण? आदित्य ठाकरेंची काय आहे भूमिका? भास्कर जाधव म्हणाले, 'सत्ताधाऱ्यांची पाप...'

सध्या आमदार कोकाटे यांच्या छातीत दुखत असल्याची त्यांची तक्रार आहे. त्यांच्यावर तज्ञांकडून उपचार सुरू आहे. त्यांची ॲजीओग्राफी सुरू आहे. त्याच्या अहवालावर आमदार कोकाटे यांची अटक ठरणार आहे.

Manikrao Kokate arrest latest update
Manikrao Kokate Politics: क्रीडा खाते गमावलेल्या माणिकरावांच्या आमदारकीवर आज फैसला? विरोधकांनी वाढवला दबाव!

दरम्यान काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी कोकाटे यांना वाचविण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे आमदार केदार यांच्याबाबत ज्या तत्परतेने निर्णय घेण्यात आला. त्याच्या उलट कोकाटे यांना संरक्षण देण्यासाठी यंत्रणा काम करत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

कनिष्ठ स्तर न्यायालयाने अजामीन पत्र वॉरंट बजावले आहे. त्याची अंमलबजावणी करणे या हाय प्रोफाईल प्रकरणात बंधनकारक आहे. राजकीय आणि विशेषता सत्ताधारी पक्षाशी संबंधित प्रकरणा असल्याने पोलिस सावध भूमिका घेत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com