Ram Shinde Controversy : गोळीबारचा थरार, वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; गुंडगिरीचा पोशिंदा कोण? रोहित पवारांनी राम शिंदेंचे 'ते' फोटो आणले समोर...

Rohit Pawar exposes Ram Shinde photos: अहिल्यानगर जामखेड शहरात झालेल्या गोळीबारात हाॅटेलमालक रोहित पवार हा युवक गंभीर जखमी झाला आहे.
Ram Shinde prostitution racket allegation
Ram Shinde prostitution racket allegationSarkarnama
Published on
Updated on

Jamkhed Firing Case: जामखेड शहरात मध्यरात्री गोळीबार झाला. एका हाॅटेलवर वेश्या व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत महिलांची केलेली सुटका, असा दोन वेगवेगळ्या घटनांचा संदर्भ देत, या घटनेतील आरोपींबरोबर भाजप विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे फोटो अन् व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर करत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

जामखेडमधील गुंडगिरीचा पोशिंदा कोण? असा सवाल करत रोहित पवार यांनी राम शिंदेसह भाजपच्या नैतिकतेवर जोरदार प्रहार केला. रोहित पवार यांच्या एक्सवरील पोस्टमुळे जामखेडमधील भाजप (BJP) अन् राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातील राजकीय युद्ध आगामी काळात चांगलच पेटणार असल्याची चिन्हं आहेत.

जामखेड शहरात गोळीबार झाला. यात हाॅटेलमालक रोहित अनिल पवार (वय 27, रा. कान्होपात्रा नगर, जामखेड) याच्या पायाला गोळी लागली आहे. रोहित पवार हा त्याच्या हाॅटेलमध्ये काम करत असताना, तिथं एका टोळक्याने धुडगूस घातला. हाॅटेलची तोडफोड करत गोळीबार केला. या टोळक्याने हाॅटेलबाहेर असलेल्या वाहनाची तोडफोड केली.

यात गोळी लागून जखमी झालेले रोहित पवार (Rohit Pawar) यांना अहिल्यानगरमध्ये खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलिसांनी घटनास्थळी काडतुसाची रिकामी पुंगळी आढळली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, त्यात चार आरोपींची नावे नमदू केली आहे. पोलिसांनी दहा जणांच्या टोळक्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

Ram Shinde prostitution racket allegation
Top 10 News : विरोधी पक्षनेतेपदासाठी कोण? कोकाटेंचा राजीनामा मंजूर, राज्यात भाजपची धुळधाण; वाचा Top-Ten राजकीय घडामोडी...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या गोळीबाराच्या घटनेचा संदर्भ घेत, समाज माध्यमांवर पोस्ट शेअर केली आहे. या घटनेत जामखेडमधील उल्हास विलास मानेविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे सांगत, यापूर्वी त्याच्याविरोधात डबल मर्डरचे गुन्हे दाखल असल्याकडे रोहित पवारांनी लक्ष वेधलं आहे.

Ram Shinde prostitution racket allegation
Manikrao Kokate Arrest : कोकाटेंपर्यंत पोहोचले नाशिकचे पोलिस; अटकेची कारवाई सुरू, मात्र...

मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं

विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्याबरोबर उल्हास विलास माने याचे असलेले पाच फोटो अन् एक व्हिडिओ शेअर करत, आता त्याच्य पाठीशी कोण आहे, हे तु्म्हींच फोटोंमध्ये बघा, असे रोहित पवारांनी म्हटले आहे. याशिवाय गल्लीतलं भांडण विधिमंडळात नेणारेही हेच आहेत, ज्यांना केवळ माझे विरोधक आहेत म्हणून भाजपने विविध पदे दिली.

आता एवढी मोठी राजकीय ताकद पाठीशी असेल, तर जामखेडमधील या गुंडांमध्ये भरदिवसा गोळ्या झाडून सामान्य माणसांचे मुडदे पाडण्याची हिंमत का येणार नाही? आणि जामखेडमध्ये गुंडगिरीला कोण पोसतंय? याचं उत्तर मुख्यमंत्री महोदयांनी द्यावं! असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

गल्लीतलं भांडण दिल्ली नेणारे प्रा. शिंदे...

रोहित पवार यांनी गोळीबारच्या घटनेबरोबर पोलिसांनी वेश्या व्यवसायावर केलेल्या कारवाई आणि त्यातील आरोपी कोण आहेत, याची माहिती दिली देणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. गल्लीतलं भांडण दिल्लीत नेणारे प्रा. राम शिंदे आणि पावलोपावली नैतिकतेच्या गप्पा झोडणारा भाजप, अनैतिक व्यवसाय करणाऱ्यांना आणि महिलांना ‘माल’ अशी लज्जास्पद भाषा वापरणाऱ्यांना कसे पोसतात, त्याचा आणखी एक पर्दाफाश, असे रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

वेश्या व्यवसायाच्या निरोपासाठी सांकेतिक भाषा

जामखेडमध्ये वॉर्ड क्रमांक 11 मधील भाजपच्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराचा सख्खा नातेवाईक सागर टकले याच्या जामखेड पॅलेस या हॉटेलवर चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून दोन कामगारांना अटक केली आणि पाच महिलांना ताब्यात घेतले आहेत, अशी माहिती सांगत आरोपीच्या भावाबरोबर प्रा. राम शिंदे यांच्याबरोबर असलेले पाच फोटो अन् संबंधित हाॅटेलवर चालणाऱ्या वेश्या व्यवसायाची सांकेतिक भाषेतील निरोपाचा फोटो व अन्य फोटो शेअर करत खळबळ उडवून दिली आहे. ही घटनेबरोबरच, ही आहे भाजपची नैतिकता, बजाओ ताली..! असे उपरोधात्मक टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

वंचित शहरातील गुंडगिरीविरोधात आक्रमक

जामखेड शहरातील गुंडगिरीविरोधात, वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक अॅड. अरुण जाधव यांनी, "शहरात सातत्याने गोळीबाराच्या घटना घडत आहेत. गुन्हेगार जे शस्त्रे घेऊन शहरात येत आहेत, ते शस्त्र कोठून येत आहेत, याचा पोलिसांनी शोध घ्यावा. तसेच घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करावी. जामखेड शहर हे गुन्हेगारमय शहर होऊ नये, यासाठी पोलिसांनी कठोर कायदेशीर कारवाई करत कायद्याचा धाक निर्माण करावा."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com