Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar : अजित पवार गटामुळे झाला दिंडोरीत भाजपचा पराभव?

Sampat Devgire

Ajit Pawar Vs BJP News : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. या पराभवाचा विधानसभा मतदारसंघ निहाय अहवाल तयार करण्यात आला आहे. भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी या पराभवाचे खापर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आमदारांवर फोडण्याचे कळते.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या डॉ पवार यांचा एक लाख 58 हजार 523 मतांनी पराभव झाला. यामध्ये राष्ट्रवादीचे खासदार भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांच्याशी नाम साधर्म्य असलेल्या बाबू भगरे या उमेदवाराला एक लाख तीन हजार मते मिळाली आहेत. त्याची गोळा बेरीज केल्यास भाजपाचा सुमारे अडीच लाख मतांनी पराभव झाला आहे. एवढ्या मतांनी होणारा हा पराभव अनपेक्षित होता.

या निवडणुकीत भाजपाचे आमदार डॉ राहुल आहेर Dr. Rahul Aher आणि शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या मतदारसंघात डॉ पवार यांना आघाडी होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे, कंसात राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर भगरे यांना मिळालेल्या मतांची आघाडी, मंत्री छगन भुजबळ ( 13,205), दिलीप बनकर (18,184), नरहरी झिरवळ ( 82,308) आणि नितीन पवार ( 45,027) अशी एक लाख 58 हजार 724 मतांनी भाजपचा उमेदवार मागे होता.

या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी एक अहवाल तयार केला आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील पराभवाचा आढावा घेण्यासाठी येत्या एक जूनला पक्षाचे निरीक्षक नाशिकला येणार आहेत. त्यांच्या उपस्थितित बैठक होईल. या बैठकीत भाजपाकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या आमदारांच्या कामकाजाचा अहवाल दिला जाणार आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT