Nashik Teachers Legislative elections : संस्थाचालकांना आमदारकी मिरवण्यासाठी हवी; गृहमंत्रालयाच्या हस्तक्षेपावर 'TDF'ची आगपाखड

TDF On Nashik Teachers Legislative Elections : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत नाम साधर्म्याचा प्रयोग, आयुक्त कार्यालयात गुंडागर्दी, गृहमंत्रालयाचा हस्तक्षेप, यावर टीडीएफचे महासचिव हिरालाल पगडाल यांनी नाराजी व्यक्त केली.
TDF press
TDF presssarkarnama

Nashik Teachers elections : नाशिक शिक्षक विधान परिषदेची निवडणुकीत "शिक्षक उमेदवार" आणि "शिक्षक नसलेले संस्थाचालक उमेदवार", अशी होत आहे. शिक्षक लोकशाही आघाडीमध्ये (टीडीएफ) फूट पडल्याचे सांगून संस्थाचालक उमेदवार दिशाभूल करत आहेत. शिक्षकांच्या या मतदारसंघात सर्रास साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर होतोय.

या निवडणुकीत काही ठराविक संस्थाचालकांमार्फत शिक्षक कार्यकर्त्यांवर बंधने घातली असल्याचे दिसते. या संस्थाचालकांना आमदारकी मिरवण्यासाठी हवी आहे. पण यासर्व दडपशाहीला शिक्षक मतदार भीक घालणार नाहीत, असा घाणाघात 'टीडीएफ' महासचिव हिरालाल पगडाल यांनी केला.

नाशिक (Nashik) विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये हिरालाल पगडाल यांनी पत्रकार परिषद घेतली. हिरालाल पगडाल यांनी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांचा समाचार घेतला. विशेष करून संस्थाचालकांच्या उमेदवारींवरून त्यांनी त्याचं सगळचं काढलं.

आमदारकी मिळवायचीच या एकाच उद्देशाने पछाडलेले शिक्षक नसलेले उमेदवार या मतदारसंघात नाम साधर्म्य उमेदवारांचे अर्ज दाखल करणे, त्यातून आयुक्त कार्यालयातच गुंडागर्दी, उमेदवारी मागे घेण्यासाठी गृहमंत्रालयाचा हस्तक्षेप, सामिष भोजनांचे आयोजन, शिक्षक मतदारांचे घरे शोधून त्यांना भेटवस्तू देऊन आमिषे दाखविणे यासारख्या गैरप्रकारांनी अक्षरशः धुडगूस घातला जात आहे. यातून काही ठराविक संस्थाचालकांमार्फत शिक्षक कार्यकर्त्यावर बंधने घातली जात असल्याचा आरोपही हिरालाल पगडाल यांनी केला.

TDF press
Kishor Darade On Vivek Kolhe : विवेक कोल्हेंना होमग्राऊंडवर येऊन घेरलं; 'आमदार दराडेंनी, काय काय सांगितलं...'

महाराष्ट्र 'टीडीएफ'कडून उमेदवारी मिळावी म्हणून महायुतीमधील शिवसेनाचे (Shiv Sena) आमदार किशोर दराडे, संदीप गुळवे, तसेच अहमदनगरमधील भाऊसाहेब कचरे यांना मुलाखती दिल्या होत्या. आमदार किशोर दराडे, संदीप गुळवे संस्थाचालक आहेत. प्रा. भाऊसाहेब कचरे शिक्षक कार्यकर्ते असल्याने ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

याउलट गेल्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले उमेदवार हे शिक्षकच नसल्याने ते विधान परिषदेत शिक्षकांच्या व शिक्षणाच्या संबंधिच्या प्रश्नांमध्ये अजिबात प्रभावीपणे काम करू शकले नाहीत. त्यामुळे या मतदारसंघातील शिक्षकांचा भ्रमनिरास झाला आहे. शिक्षकांच्या व शिक्षणाच्या समस्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. "आम्हाला वि‌द्यार्थ्यांना शिकवू द्या" म्हणून शिक्षकांना आंदोलन करावे लागल्याचे हिरालाल पगडाल यांनी सांगितले.

TDF press
Nashik Teacher Constituency : नाशिक शिक्षकसाठी नगरमध्ये 20 केंद्र; चार तालुक्यात सर्वाधिक मतदार

सेवाशाश्वती, सेवानिश्चिती, पेन्शन व शिक्षकांचे पगार बँकेत शिक्षकांच्या खाती जमा करणे यासारख्या प्रश्नांवर 'टीडीएफ'च्या प्रतिनिधींनी सरकारला धारेवर धरून विधान परिषदेत तर कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर येऊन दीर्घकाळ आंदोलन केले. यामध्ये टीडीएफ चळवळीतील रेडकर सरांसारख्या कार्यकर्त्याला मरण पत्करावे लागले. हा 'टीडीएफ'चा इतिहास असून प्रत्येक उमेदवाराला राजकीय पक्षाची अधिकृत उमेदवारी घेऊनही टीडीएफशी संबंध असल्याचे दाखवावे लागते. आज 'टीडीएफ'ने शिक्षकांसाठी मिळविलेली पेन्शन गेली, राष्ट्रीयकृत बँकेत पगार करण्यासाठी आंदोलन करावे लागत असल्याकडे हिरालाल पगडाल यांनी लक्ष वेधले.

खासगी शाळांमधील विनाअनुदानित शिक्षकांना सेवाशाश्वती, सेवानिश्चिती नाही, टप्पाअनुदान नाही, आश्रमशाळेच्या मनमानेल त्या वेळा, खाजगी वि‌द्यापीठे, तंत्रशिक्षण, कृषीशिक्षण यामध्ये संघटनांचा धाक अधिकाऱ्यावर राहिलेला नाही हे केवळ शिक्षकांचा आमदार शिक्षक नसल्याने होत असल्याचे शिक्षकांच्या लक्षात येत आहे. हे सर्व 'टीडीएफ'चं परत मिळवून देऊ शकते हा विश्वास शिक्षकांना आहे.

शिक्षक नसलेले राजकीय पक्षाचे उमेदवार आमदार किशोर दराडे, संदीप गुळवे तसेच भाजपाशी संबंधित असलेले व अपक्ष उमेदवारी करत असलेले उमेदवार विवेक कोल्हे आपल्या संबंधित शिक्षण संस्थांमधील कर्मचाऱ्यांवरती दबाव आणून आपल्याबरोबर असल्याचे भासवून 'टीडीएफ'मध्ये फूट असल्याचे दाखवित आहेत व शिक्षक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप हिरालाल पगडाल यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com