Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar : भाजपचा अजित पवारांना धक्का, धुळ्यातला ताकदवान नेता लावला गळाला

BJP gives Ajit Pawar a major setback as key NCP leader Satyajit Sisode from Dhule joins BJP ahead of local body elections : स्थानिक पातळीवरील समीकरण लक्षात घेता अनेक ठिकाणी घटक पक्षांमधीलच कार्यकर्ते व नेते गळाला लावण्याचे काम सुरु आहे. आता धुळे जिल्ह्यात भाजपने अजित पवार यांनाच धक्का दिला आहे.

Ganesh Sonawane

Dhule Politics : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीतही निवडणुकीपूर्वी आपआपल्या पक्षात जास्तीत जास्त नेते व कार्यकर्त्यांचा प्रवेश करुन घेत पक्ष बळकट केला जात आहे. स्थानिक पातळीवरील समीकरण लक्षात घेता अनेक ठिकाणी घटक पक्षांमधीलच कार्यकर्ते व नेते गळाला लावण्याचे काम सुरु आहे.

दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी धुळे जिल्ह्यातील कॉंग्रेससह भाजपला खिंडार पाडलं. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस सुनिल नेरकर यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. त्याचवेळी भाजपनेही अजित पवार यांच्या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा ग्रामीणचे कार्याध्यक्ष सत्यजित उदय सिसोदे यांना गळाला लावत त्यांचा भाजपात प्रवेश करुन घेतला. त्याचा मोठा फटका अजित पवार यांना बसणार आहे.

सिसोदे हा नरडाणा (ता. सिंदखेडा) येथील नामांकित परिवार आहे. त्यांच्या कुटुंबाचा राजकारणात मोठा दबदबा आहे. सत्यजित सिसोदे गेल्या पंचवीस वर्षांपासून शिंदखेडा तालुक्यातील वंचित, शोषीत, तसेच ग्रामस्थांसह शेतकऱ्यांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देत आले आहे. गेल्या २३ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध पदांवर ते कार्यरत होते. आधी शरद पवारांसोबत होते नंतर ते अजित पवार गटात आले. आता त्यांनी भाजपची वाट धरल्याने नरडाणा पंचक्रोशीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठे खिंडार पडले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला त्याचा मोठा फटका बसणार आहे.

नाशिक येथे नुकत्याच झालेल्या विभागीय मेळाव्यात धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वात सिसोदे यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस व निरीक्षक अरुण सिंग, भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पक्षाचे प्रदेश कार्यकारणी कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे उपस्थित होते.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे सिसोदे नातेवाईक आहेत. ते भाजपात असल्याने सिसोदेही भाजपात गेल्याचे बोलले जात आहे. शिवाय जिल्हा परिषदेसाठी सिसोदे इच्छुक आहेत. त्यामुळे स्थानिक राजकीय गणितं लक्षात घेता त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मंत्री रावल यांचे नेतृत्व, विकास कार्यावर, पक्षीय ध्येयधोरणावर विश्वास ठेवत आपण भाजप मध्ये प्रवेश केला असून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी प्रतिक्रिया पक्षप्रवेशानंतर सिसोदे यांनी दिली.

माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्यासह आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम भदाणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, शहर-जिल्हाध्यक्ष गजेंद्र अपंळकर, माजी जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, शिंदखेडा मंडळाध्यक्ष मोतीलाल वाकडे आदींनी सिसोदे यांच्या भाजप प्रवेशाचे स्वागत केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT