Ajit Pawar, Amol Mitkari Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar On Amol Mitkari : अमोल मिटकरींना अजितदादांची साथ; मनसेला फटकारले, म्हणाले...

Raj Thackeray And Akola MNS : अजित पवारांवर टिप्पणी केल्यानंतर मिटकरींनी राज ठकारेंवर टीका केली होती. त्यानतंर त्यांच्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्यावरील हल्ल्या केल्यानंतर मुख्य आरोपी फरार आहेत. त्यांना अटक व्हावी, या मागणीसाठी मिटकरी अकोला पोलिस उपअधिक्षक कार्यालय परिसरात ठाण मांडून बसले आहेत.

त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केल्यानंतरही कोणीही बोलत नाही, अशी आपल्या पक्षाच्या आमदारांवर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर स्वतः अजित पवार अमोल मिटकरींच्या पाठीशी असल्याचे संकेत दिले आहेत.

पुण्यात पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या मनसेचे प्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांनी अजित पवारांवर टिप्पणी केली होती. त्यावर मिटकरींनी ठाकरेंवर शेलक्या शब्दात प्रहार केला होता. ती टीका जिव्हारी लागल्याने मनसे कार्यकर्त्यांनी मिटकरी याच्या वाहनाची तोडफोड केली. त्यावर पोलिस अधिक्षक कार्यालयात उपोषणाला बसलेल्या मिटकरींनी आपल्या पक्षांच्या आमदारांना सुनावले होते.

त्यांच्या नेत्यांवर थोडे बोलेले तरी ते लोक अंगावर येतात. ठिकठिकाणचे त्यांचे नेते धमक्या देत आहेत. आमच्या पक्षाचे नेते, आमदार मात्र काहीही प्रत्युत्तर देत नाहीत, अशी खंत मिटकरी यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या चुप्पीवर व्यक्त केली होती. या झालेल्या प्रकारावर नाशिकमध्ये अजित पवारांना Ajit Pawar छेडले असता त्यांनी कुणी कायदा हातात घेतला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

ते म्हणाले, पुण्यात पाहणी करण्यास गेलेल्या राज ठाकरेंनी माझ्याबद्दल काहीतरी भडक वक्तव्य केले. प्रत्येक पक्षाबाबत आस्था आसणारा एक वर्ग असतो. प्रत्येकाने बोलताना तारतम्य बाळगले पाहिजे. आपला महाराष्ट्र सुसंस्कृत आहे. मात्र काहीजण कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतात. मी तुम्हाला बघून घेऊन, असे विधाने करतात. कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणाला दिलेला नाही.

यात जर कुणी कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला तर संबंधितांवर पोलिसांकरवी कायदेशीर कारवाई केली जाईल. काही राजकीय नेत्यांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची विधाने तशाच पद्धतीने आली. प्रत्येकाने त्यावर काय आपण बोलले पाहिजे. कायद्याच्या चौकटीत राहून विधाने केली पाहिजे. नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराच अजित पवारानी नाव न घेता मनसेच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT