Ajit Pawar On Raj Thackeray : अजित पवारांनी राज ठाकरेंना सुनावलं; म्हणाले, राज्यात वाचाळवीर...

Pune Political News : पुण्यात पाहणी करण्यास गेलेल्या राज ठाकरेंनी माझ्याबद्दल काहीतरी भडक वक्तव्य केले.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : पुण्यात पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर एक विधान केले. त्यावर अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरींनी राज ठाकरेंचा समाचार घेतला.

त्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मिटकरींवर हल्ला केला. त्यावर दोन दिवसांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी, बोलताना तारतम्य बाळगले पाहिजे, असा टोला राज ठाकरेंना लगावला.

गेल्या आठवड्यात पुणे शहराला पूराचा फटका बसला. पूरग्रस्त भागाची राज ठाकरेंनी Raj Thackeray पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अजित पवारांवर एक टिप्पणी केली. त्यावर चिडलेल्या मिटकरींनी ठाकरेंवर शेलक्या शब्दांत प्रत्युत्तर दिले. त्यामुळे बिथरलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी मिटकरींच्या वाहनाची तोडफोड केली. या सर्व प्रकाराचा अजित पवारांनी नाशिकमधून समाचार घेतला.

ते म्हणाले, पुण्यात पाहणी करण्यास गेलेल्या राज ठाकरेंनी माझ्याबद्दल काहीतरी भडक वक्तव्य केले. प्रत्येक पक्षाबाबत आस्था आसणारा एक वर्ग असतो. प्रत्येकाने बोलताना तारतम्य बाळगले पाहिजे. आपला महाराष्ट्र सुसंस्कृत आहे. मात्र काहीजण कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतात. मी तुम्हाला बघून घेऊन, असे विधाने करतात. कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणाला दिलेला नाही.

Ajit Pawar
Amol Mitkari : राज ठाकरेंवरील विधानावर ठाम! अमोल मिटकरी नेमके काय म्हणाले?

तुम्ही विकासाबाबत बोला. कुठे अन्याय झाला असेल, तर त्याला वाचा फोडा. त्याबाबत काय खबरदारी घ्यायची ती आम्ही सरकार म्हणून घेऊ. पण राज्यात वाचाळवीरांची संख्या वाढलेली आहे. कारण नसताना काहीतरी भडक वक्तव्य करायची. त्यातून स्वतःकडे लक्ष वेधून घ्यायचे. या गोष्टी बंद झाल्या पाहिजे. ही आपल्या राज्याची संस्कृती नाही, असेही पवार Ajit Pawar म्हणाले.

Ajit Pawar
Koregaon Assembly : कोरेगावात रान पेटलं; शिंदे गट - शरद पवार गटात खडाजंगी, काय आहे कारण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com