Koregaon Assembly : कोरेगावात रान पेटलं; शिंदे गट - शरद पवार गटात खडाजंगी, काय आहे कारण?

Shashikant Shinde Vs Shivsena : पुरव्याशिवाय हरकत घेतलेली नावे कमी करू नयेत. तसेच काटकर याच्यावर गुन्हा दाखल करावा.
Shashikant Shinde
Shashikant Shinde Sarkarnama
Published on
Updated on

पांडुरंग बर्गे

Koregaon Political News : विधानसभा मतदारसंघ मतदारयादीतील सुमारे आठ हजार मतदारांच्या नावांवर एकनाथ शिंदे गट शिवसेनेचे कोरेगाव तालुकाप्रमुख संजय काटकर यांनी हरकती घेतल्या आहेत. त्या हरकतींवर शुक्रवारी प्रांताधिकारी कार्यालयात सुनावणी झाली.

त्यावेळी प्रथम गावस्तरावर शासन यंत्रणांकडून "क्रॉस व्हेरिफिकेशन"करून गरज लागल्यास सुनावणी घ्यावी, अशी सूचना आमदार शशिकांत शिंदे यांनी केली. तर या हरकती चुकीच्या माहितीवर घेतल्याने काटकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने साताऱ्यात तणावाचे वातावरण झाले होते.

प्रांताधिकरी कार्यालयातील सुनावणीप्रसंगी कोरेगाव पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे, माजी सदस्या प्रतिभाताई बर्गे, श्रीमंत झांजुर्णे, अरुण माने किशोर बर्गे, नगरसेवक हेमंत बर्गे, प्रीतम बर्गे, डॉ. गणेश होळ आदी प्रमुखांसह मतदार यादीमधील ज्यांच्या नावांवर हरकत घेतली गेली आहे, असे बहुतांश मतदार, नातेवाईक उपस्थित होते. मतदारांची बाजू ॲड. पांडुरंग भोसले, ॲड. धैर्यशील घार्गे, ॲड. अनिल फळके, ॲड. नीलेश झांजूर्णे, ॲड. अमर शिर्के यांनी मांडली.

सुनावणीवेळी राष्ट्रवादी शरद पवार Sharad Pawar गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. केवळ राजकीय हेतूने राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांच्या मतदारांवर काटकर यांनी हरकत घेतली आहे. हरकत घेताना सबळ पुरावे सादर केलेले नाहीत. त्यामुळे पुरव्याशिवाय हरकत घेतलेली नावे कमी करू नयेत. तसेच काटकर याच्यावर गुन्हा दाखल करावा, असा जोरही शरद पवार गटाकडून लावण्यात आला. त्यावर केवळ कोणी तरी हरकत घेतल्याने नाव कमी होत नसल्याचे प्रांताधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी अभिजित नाईक यांनी स्पष्ट केले.

Shashikant Shinde
Maharashtra Sugar Factory : विधानसभेपूर्वी शिंदे-फडणवीस-पवारांची कारखान्यांतून 'मतपेरणी'

आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde म्हणाले, मूळात ही घटना चुकीची आहे. काही कुटुंबातील सर्व लोकांची नावे कमी करा म्हणून हरकत घेतली गेलेली आहे. तेव्हा सुनावणीस दोन ते तीन दिवस उशीर होऊ द्या. पण प्रथम हरकत घेतलेल्या मतदारांच्या नावांबाबत त्या त्या मतदारांच्या गावपातळीवरील शासकिय यंत्रणांकडून क्रॉस व्हेरिफिकेशन करावे. पुरावा असेल, त्यांची नावे आहे तशीच मतदार यादीत ठेवावीत. इतर नावांवर आवश्यकता असल्यास सुनवणी घेऊन निर्णय घ्यावा. तो निर्णय सर्वांना मान्य असेल, असेही शिंदेंनी सांगितले.

माजी सभापती राजाभाऊ जगदाळे यांच्यासह अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काटकर यांनी पूर्णतः राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून, मोघम पद्धतीने मतदारांच्या नावांबाबत हरकत घेतली. तसेच सुनावणीस ते स्वतः गैरहजर राहिल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रांत नाईक यांच्याकडे केली.

त्यावर नाईक यांनी कलम ३१ नुसार याबाबत माहिती घेवून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन आमदार शिंदे आणि उपस्थित कार्यकर्त्यांना दिले. यावेळी कोरेगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश माने आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

(Edited by Sunil Dhumal)

Shashikant Shinde
Rajesh Vitekar News : राजेश विटेकरांचा दुर्राणींना धक्का; संधी मिळताच केला करेक्ट कार्यक्रम

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com