Akole Nagar Panchayat : अकोले नगरपंचायतीतील भारतीय जनता पक्षाच्या आठ नगरसेवकांविरोधात दाखल करण्यात आलेली अपात्रतेची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणीनंतर नामंजूर केली आहे. त्यामुळे संबंधित नगरसेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, भाजपच्या आणखी चार नगरसेवकांच्या पक्षांतरासंदर्भातील अपात्रता प्रकरणाची सुनावणी 27 ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे अकोलेतील भाजपमधील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे.
भाजपचे (BJP) अकोले मंडलाध्यक्ष राहुल देशमुख यांनी नगरपंचायतीतील पक्षाच्या आठ नगरसेवकांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अपात्रतेची तक्रार दाखल केली होती. संबंधित नगरसेवकांनी पक्षाच्या भूमिकेविरोधात काम केल्याचा आणि पक्षशिस्तीचा भंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.
या तक्रारीवर जिल्हाधिकाऱ्यांसमोर (Collector) सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आठ नगरसेवकांविरोधातील अपात्रतेची तक्रार फेटाळून लावली. त्यामुळे या नगरसेवकांना सध्या दिलासा मिळाला आहे.
अकोले नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांविरोधात मांडण्यात आलेल्या अविश्वास ठरावाच्या वेळी नगरसेवकांच्या भूमिकेवरून भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते. याच पार्श्वभूमीवर राहुल देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपात्रतेची मागणी केली होती.
दरम्यान, नगराध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावावेळी भाजपचे चार नगरसेवक गैरहजर राहिले होते. त्यांच्या भूमिकेविरोधातही अपात्रतेची प्रक्रिया सुरू आहे. या चार नगरसेवकांच्या प्रकरणाची पुढील सुनावणी 27 ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे आठ नगरसेवकांना अपात्रतेच्या तक्रारीतून दिलासा मिळाल्यानंतर आता चार नगरसेवकांच्या प्रकरणात जिल्हाधिकारी काय निर्णय देतात, याकडे अकोलेच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या निर्णयाचा स्थानिक भाजपच्या अंतर्गत समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.