NCP SP News : शरद पवारांच्या पक्षाला धक्का : कर्जतचे 6 नगरसेवक अपात्र; राजकीय समीकरणे बदलणार

Six Karjat councillors face disqualification over alleged whip violation : संतोष मेहेत्रेंवरील अविश्वास ठरावावेळी गैरहजेरी; जिल्हाधिकाऱ्यांचा सहा वर्षांसाठी अपात्रतेचा आदेश. प्रवीण घुले गटाला धक्का, राम शिंदे गटाची सरशी झाल्याची चर्चा.
Karjat Nagar Panchayat 6 corporators disqualified
Karjat municipal council corporators disqualifiedSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar party setback in Karjat: कर्जत नगरपंचायतीच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. उपनगराध्यक्ष संतोष मेहेत्रे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावरील मतदानावेळी पक्षाचा व्हिप असतानाही गैरहजर राहिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सहा नगरसेवकांना अपात्र ठरविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी मंगळवारी यासंदर्भातील आदेश दिले.

या निर्णयामुळे कर्जतच्या स्थानिक राजकारणातील समीकरणे बदलण्याची शक्यता असून प्रवीण घुले गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. तर भाजपचे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्या गटाची या प्रकरणात सरशी झाल्याची राजकीय चर्चा आहे.

कर्जत नगरपंचायतीचे (Municipal) उपनगराध्यक्ष संतोष मेहेत्रे यांच्याविरोधातील अविश्वास ठरावावर 15 जुलै रोजी विशेष सभेत मतदान (Voter) घेण्यात आले होते. या सभेला नगरसेविका रोहिणी घुले, मोनाली तोटे तसेच भाऊसाहेब तोरडमल, भास्कर भैलुमे, संतोष मेहेत्रे आणि ताराबाई कुलथे हे सहा नगरसेवक गैरहजर राहिले. सभेच्या कामकाजाचा अहवाल त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता.

Karjat Nagar Panchayat 6 corporators disqualified
Six Councillors Disqualification : कर्जतमध्ये पुन्हा राजकीय खळबळ; भाजपमध्ये गेलेल्या सहा नगरसेवकांना अपात्रतेची नोटीस

गटनेत्यांनी बजावला होता व्हिप

कर्जत नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटाच्या घटनेत गटनेत्याला व्हिप बजावण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते सतीश पाटील यांनी उपनगराध्यक्ष मेहेत्रे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव संमत करण्यासाठी विशेष सभेला उपस्थित राहून ठरावाच्या बाजूने मतदान करण्याचे निर्देश सर्व नगरसेवकांना दिले होते. मात्र, संबंधित सहाही नगरसेवक सभेला गैरहजर राहिल्याने त्यांनी पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला.

Karjat Nagar Panchayat 6 corporators disqualified
Madhur Mhatre Disqualification Petition : शिंदेंच्या शिवसेनेत गेल्याचा दावा, पण अपात्र नाही; मधुर म्हात्रेंना मोठा दिलासा

सहा वर्षांसाठी अपात्रतेचा आदेश

व्हिपचे पालन न केल्याप्रकरणी महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम, 1986 मधील कलम 3(1)(ब) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार संबंधित सहा जणांना आदेशाच्या दिनांकापासून सहा वर्षांसाठी नगरसेवक किंवा स्थानिक प्राधिकरणाचे सदस्य राहण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. यामुळे गटनेते सतीश पाटील यांनी दाखल केलेला सदस्य अनर्हता प्रस्ताव मान्य करण्यात आला. या प्रकरणात पाटील यांच्या बाजूने ज्येष्ठ विधिज्ञ गोरक्ष पालवे यांनी कामकाज पाहिले.

कर्जतच्या राजकारणातील समीकरणे बदलणार?

सहा नगरसेवकांच्या अपात्रतेमुळे कर्जत नगरपंचायतीतील राजकीय गणितावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. हा निर्णय प्रवीण घुले गटासाठी धक्कादायक मानला जात असून, प्रा. राम शिंदे यांच्या गटाची राजकीय पकड अधिक मजबूत झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. आगामी काळात या निर्णयाविरोधात न्यायालयीन किंवा इतर कायदेशीर पावले उचलली जातात का, याकडेही लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com