Akshay Kardile Oath Ceremony Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Akshay Kardile Oath Ceremony : ‘माझे वडील…’ म्हणत अक्षय कर्डिले थबकले; शपथविधीत भावुक क्षण, राहुल नार्वेकरांनाही करावा लागला इशारा!

Akshay Kardile created emotional moment Maharashtra Assembly while taking oath, remembering his late father Shivaji Kardile and carrying forward his political legacy : भाजपचे नवखे आमदार अक्षय कर्डिले यांची, दिवंगत वडील शिवाजी कर्डिले यांच्या आठवणी जागवत विधानसभेत एन्ट्री; शपथेनंतर थेट अध्यक्षांच्या पाया पडले, सभागृहात चर्चेचा विषय!

Pradeep Pendhare

Akshay Kardile Maharashtra Assembly : भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर झालेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी झाले.

भाजपचे युवा आमदार अक्षय कर्डिले यांनी आज विधानसभेत सदस्यत्वाची शपथ घेताना, असा एक भावनिक क्षण निर्माण केला, ज्याची आता राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) हे अक्षय कर्डिले यांना शपथ देण्यासाठी उभे राहिले होते. मात्र शपथ सुरू होण्याआधीच अक्षय कर्डिले यांनी अचानक “माझे वडील…” असा शब्दोच्चार केला आणि काही क्षण थबकले. सभागृहात काहीसा भावनिक वातावरण निर्माण झालं. त्यानंतर राहुल नार्वेकर यांच्या पाठोपाठ त्यांनी सदस्यत्वाची शपथ पूर्ण केली.

या आधी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर भाजपचे (BJP) अक्षय कर्डिले यांनी शपथ घेतली. विशेष म्हणजे, या वेळी त्यांचा संपूर्ण पेहराव दिवंगत वडील शिवाजी कर्डिले यांच्या शैलीची आठवण करून देणारा होता.

शिवाजी कर्डिले यांच्या डोक्यावर कायम असणारी गांधी टोपी, कपाळावर वारकरी संप्रदायाचा काळा बुक्का आणि साधा पारंपरिक लूक! अगदी त्याच पद्धतीने अक्षय कर्डिले सभागृहात दाखल झाले होते. डोक्यावर गांधी टोपी, कपाळावर टिळा, चेहऱ्यावर स्मित आणि आत्मविश्वासपूर्ण देहबोली यामुळे त्यांची एन्ट्री चर्चेचा विषय ठरली.

अक्षय कर्डिलेंची 'जय श्रीराम'ची घोषणा

शपथ पूर्ण होताच अक्षय कर्डिले यांनी “जय श्रीराम” अशी घोषणा दिली. त्यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्षांसमोर स्वाक्षरी केली आणि थेट राहुल नार्वेकर यांची भेट घेत हस्तांदोलन केले. यानंतर त्यांनी सभापतींच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. शपथ घेतलेला सदस्य हा अध्यक्षांच्या समोरून न जाता, त्यांच्या आसनाच्या मागून बाहेर पडतो, असा विधिमंडळाचा नियम आहे. नवखे असल्यामुळे अक्षय कर्डिले यांना स्वतः राहुल नार्वेकर यांनी इशारा करत त्यांना आसना मागून जाण्याचा इशारा केला.

मुख्यमंत्री फडणवीसांची खेळी अन् मविआ तोंडघशी

दरम्यान, भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढत अपेक्षित होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालत विरोधी आघाडीतील प्राजक्त तनपुरे यांची माघार घडवून आणल्याची चर्चा रंगली.

अक्षय कर्डिलेंची मुंबईत दमदार एन्ट्री

प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतल्यानंतर अक्षय कर्डिले यांचा विजयाचा मार्ग जवळपास मोकळा झाला. त्यामुळे महाविकास आघाडीला ऐनवेळी गोविंद मोकाटे यांना उमेदवारी द्यावी लागली. मात्र या निवडणुकीत अक्षय कर्डिले यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवत मुंबईत दमदार एन्ट्री केली आहे.

गुडबुकमधील प्राजक्त तनपुरे विधान परिषदेवर

राजकीय वर्तुळात आता आणखी एका चर्चेला उधाण आलं आहे. निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘गुडबुक’मध्ये गेलेले प्राजक्त तनपुरे यांना नंतर विधान परिषदेवर संधी देण्यात आली आणि त्यांची निवडही बिनविरोध करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT