Ambadas Pandhade Shivsena Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ambadas Pandhade Shivsena : बाळासाहेबांनी उमेदवारी देऊ केली, पण राठोडांसाठी नाकारली! अंबादास पंधाडे यांचा अनोखा किस्सा

Veteran Shiv Sena leader Ambadas Pandhade, known loyalty Balasaheb Thackeray, passes away, bringing back memories political journey and ties with Anil Rathod Ahilyanagar : बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या अंबादास पंधाडे यांचे निधन; अहिल्यानगरमधील शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाचे योगदान, राजकीय संघर्षाच्या आठवणींना उजाळा.

Pradeep Pendhare

Ambadas Pandhade death news : अहिल्यानगरमधील कट्टर शिवसैनिक अंबादास माधवराव पंधाडे (वय 75) यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक, अशा विविध पदांवर त्यांनी काम केले होते. पण त्यांना बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक म्हणूनच ओळखले जायचे.

यातूनच अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेनेचा आक्रमक ढाण्या वाघ म्हणून त्यांची ओळख झाली होती. अंबादास पंधाडे यांच्या निधनानंतर त्यांच्यातील आक्रमक शिवसैनिक कार्यकर्ता म्हणून आठवणींना उजाळा दिला जाऊ लागला आहे. शिवसेनेत राहून त्यांचे नेत्यांबरोबर झालेल्या राजकीय घमासानच्या अनेक आठवणी आहेत.

अंबादास पंधाडे यांच्या एका मुलाखतीत, छगन भुजबळ यांच्या शिवसेनेतील (Shivsena) बंडखोरीचा संदर्भ देताना, त्यावेळी त्यांच्याबरोबर 18 आमदार गेले होते. पुढे आणखी सहा आमदार संपर्कात होते. यातून 1996 मध्ये काँग्रेसचे गोपाळराव झोडगे यांचे नाव चर्चेत आले होते. त्यांना उमेदवार देण्याचा निर्णयापर्यंत बाळासाहेब ठाकरे पोहोचले होते. झोडगे यांचा भुजबळांशी असलेल्या संपर्काचे पुरावे अन् अनिल राठोड यांचा असलेला जनसंपर्क, पैसा न खाणारा कार्यकर्ता, आमदार, यातून पुढे उमेदवारीसाठी बाळासाहेबांसमोर केलेली यशस्वी शिष्टाईचा संदर्भ मिळतो.

अनिल राठोडांसाठी करत असलेल्या शिष्टाईवेळी बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) पंधाडे यांनाच उमेदवारी देऊ केली होती. मात्र या ठाण्या वाघाने बाळासाहेबांसमोर नम्रपणे उमेदवारी नाकारली. राठोड यांच्यासाठीच उमेदवारी मागितली होती. पंधाडे यांचासारखा कट्टर शिवसैनिक पुन्हा होणे नाही, असे जुने-जाणते शिवसैनिकांनी म्हणत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

अंबादास पंधाडे यांच्या आक्रमकपणा एवढा होता की, त्यावेळी शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिल राठोड यांच्याबरोबर देखील त्यांचे राजकीय घमासान झाले होते. या वादानंतर देखील त्यांनी शिवसेना सोडली नव्हती. त्यांना शिवसेनेतून काढण्याची हिंमत देखील कोणी दाखवली नाही. विशेष म्हणजे, त्यांनी दुसऱ्या कोणत्याही पक्षात प्रवेश केला नव्हता. ते शेवटपर्यंत बाळासाहेबांचा ढाण्या वाघ म्हणूनच राहिले.

शिवसेनेतच राहून त्यांची राजकीय वाटचाल सुरू होती. जिल्हाप्रमुख, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक पदावर काम करताना, 2008 मध्ये महापौरपदावर शिवसेनेकडून संधी मिळेल, अशी इच्छा होती. पण त्यांची इच्छा अपूर्णच राहिली. विशेष म्हणजे, त्यावेळी शिवसेनेकडे अहिल्यानगर शहरात बहुमत होते. यातूनच पुढे अनिल राठोड यांच्याशी त्यांचा राजकीय संघर्ष उफळला.

एकनाथ शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी अंबादास पंधाडे यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले, "अंबादास पंधाडे म्हणजे, शिवसेनेचा, बाळासाहेबांचा ठाण्या वाघ! अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना घडवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. शिवसेना अहिल्यानगर जिल्ह्यात आणण्यात जे काही मोजके शिवसैनिक होते, त्यात अंबादास पंधाडे यांचे नाव पुढे येते. उपनगराध्यक्ष म्हणून अहिल्यानगर शहरात चांगले काम केले."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT