Congress Vs BJP: भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला आणि गरिबांचे कल्याण सहन होत नाही. तळागाळातल्या आणि उपेक्षितांना न्याय देणारी भूमिका त्यांना मान्य नाही. याबाबत भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे.
गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेच्या अधिवेशनात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे वातावरण अद्यापही तापले आहे. नाशिकमध्ये या संदर्भात विविध पुरोगामी संघटना आणि कार्यकर्त्यांनी सातत्याने आंदोलन केले आहे. काँग्रेस यावर आक्रमक झाली आहे.
या संदर्भात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जमून निषेध आंदोलन केले. यावेळी त्यांनी मनुस्मृति हा ग्रंथ फाडला. गृहमंत्री अमित शहा यांना पदावरून दूर करावे, अशी मागणी केली.
ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक राजेंद्र बागुल यांनी यावेळी मनुस्मृतीतील सर्व व्यवस्था केंद्रातील भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा हवे आहेत. गरीब आणि महिलांना न्याय देण्यात हे सरकार कमी पडले आहे. या संदर्भात ते केवळ देखावा करीत आहेत असा आरोप केला.
संसदेच्या अधिवेशनात गृहमंत्री अमित शहा यांनी जाणीवपूर्वक आणि तथ्यहीन भूमिका मांडली. काँग्रेसला आणि दिवंगत पंतप्रधान पंडित नेहरू यांना कमी लेखण्याच्या प्रयत्नात ते स्वतःच अडकले. या सर्व ध़पडीत त्यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांना या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांना तातडीने पदावरून दूर करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, शहराध्यक्ष आकाश छाजेड, काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष संतोष ठाकूर, सुरेश मारू यांचं विविध पदाधिकारी आणि नेत्यांनी यावेळी भारतीय जनता पक्षावर टीका केली. याबाबत भारतीय जनता पक्षाने तातडीने कारवाई न केल्यास अधिक मोठे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
संसदेच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी डॉ आंबेडकर यांच्या विषयी केलेल्या विधानाचे पडसाद अद्यापही उमटत आहे. नाशिकमध्ये विविध मागासवर्गीय संघटना तसेच सामाजिक संघटनांनी या संदर्भात आंदोलन केले आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि अंगणवाडी सेविकांनी यावर आंदोलन केले. त्यामुळे अमित शहा यांच्या विरोधातील वातावरण दिवसेंदिवस तापतच आहे. आता काँग्रेस यावर अधिक आक्रमक झाली आहे.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.