Radhakrishna Vikhe : विखे-थोरातांमध्ये पुन्हा राजकीय संघर्ष पेटणार; महायुतीकडून संगमनेरमध्ये 'स्थानिक'साठी मोर्चेबांधणी

Radhakrishna Vikhe Balasaheb Thorat Political Clash : मंत्री राधाकृष्ण विखे यांनी संगमनेरमध्ये परिवर्तनासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला तयारी लागण्याच्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
Radhakrishna Vikhe | Balasaheb Thorat | Amol Khatal
Radhakrishna Vikhe | Balasaheb Thorat | Amol KhatalSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीत संगमनेरमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे यांची राजकीय खेळी यशस्वी झाली अन् काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना पराभवाचा हादरा बसला. मंत्री विखे यांनी अमोल खताळ यांच्या आमदारकीच्या रुपाने संगमनेरमध्ये विधानसभेत यश मिळवले.

आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संगमनेरमध्ये यश मिळवण्याची तयारी मंत्री विखेंनी आमदार खताळ यांच्या माध्यमातून सुरू केली असून, तशा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याच्या सूचना केल्या आहेत.

राधाकृष्ण विखे यांनी जलसंपदा मंत्रि‍पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर ते श्रीक्षेत्र निझर्णेश्वर इथं येत दर्शन घेतलं. यावेळी महायुतीचे पदाधिकारी आणि विखे समर्थक उपस्थित होते. आमदार अमोल खताळ, ज्येष्ठ नेते बापूसाहेब गुळवे, राष्ट्रवादीचे (NCP) तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, कैलास तांबे, मच्छिंद्र शेटे उपस्थित होते.

Radhakrishna Vikhe | Balasaheb Thorat | Amol Khatal
Dinvishesh 25 December : काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी; वाचा आजचे दिनविशेष

मंत्री विखे (Radhakrishna Vikhe) यांनी संगमनेरमध्ये विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशाचे कौतुक करताना पुढचं लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याचे सूतोवाच केले. आमदार अमोल खताळ यांच्या विजयाने संगमनेर तालुक्यात परिवर्तन होऊ शकते, हा विश्वास सर्वांना मिळाल्याने भविष्यात अशाच संघटीतपणे आपल्याला संगमनेर तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवायचे आहे. त्यादृष्टीने तयारीला लागा अशा सूचना केल्या.

Radhakrishna Vikhe | Balasaheb Thorat | Amol Khatal
Maharashtra Politics News LIVE Updates : पूजा खेडकरवर अटकेची टांगती तलवार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा विखे आणि थोरात यांचा संघर्ष पाहायला मिळू शकतो. मंत्री विखे स्थानिकच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा संगमनेरमध्ये लक्ष घालणार, हे पुन्हा निश्चित झालं आहे. विधानसभा निवडणुकीप्रमाणे संघटीतपणे संगमनेरमध्ये यश मिळवायचे, अशी बांधणी मंत्री विखे करणार असल्याचे दिसते.

आमदार अमोल खताळ यांनी देखील संगमनेर तालुक्यात भविष्यात मंत्री विखे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या जातील, असे सांगून तयारी करणार असल्याचे संकेत दिले. तसेच मंत्रि‍पदी निवड झाल्यानिमित्ताने मंत्री विखे यांचा संगमनेरमध्ये पाच जानेवारीला नागरी सत्कार आयोजित केल्याची माहिती आमदार खताळ यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com