Sangamner MLA Amol Khatal affidavit case : "न्यायपालिकेवर विश्वास आहे. संगमनेर जनतेचा विजय निश्चित आहे आणि त्यातून माझा विजय होईल. याची मला खात्री आहे. न्यायालयाने याचिका फक्त सुनावणीसाठी स्वीकारली आहे.
भावी मुख्यमंत्र्यांना अचानक स्वप्न पडायला लागले आहेत की, आम्ही भावी मुख्यमंत्री होतोय, आम्ही पुन्हा आमदार होतोय. तुम्हाला सत्तेची 40 वर्षे मिळाली. तुमचा पराभव 42 वर्षाच्या मुलाने केले. तुम्ही जेव्हा आमदार होतात, तेव्हा मी 2 वर्षांचा होतो. नियतीने तुमचा पराभव केला आहे," असा घणाघात एकनाथ शिंदे शिवसेनेचे संगमनेरमधील आमदार अमोल खताळ यांनी केला.
एकनाथ शिंदे शिवसेनेचे (Shivsena) संगमनेर आमदार अमोल खताळ यांनी निवडणूक लढताना, प्रतिज्ञापत्रात चुकीची आणि अपूर्ण माहिती दिल्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात खटाला चालणार आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आमदार खताळ यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु आमदार खताळ यांची विशेष अनुमती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आमदार खताळांविरोधात उच्च न्यायालयात कायदेशीर खटला चालण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर, आमदार खताळ यांनी न्यायपालिकेवर विश्वास अशी जाहीरपणे भूमिका घेतली. परंतु काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे नाव न घेता, जोरदार फटकेबाजी केली. संगमनेरमधील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्व समाधान शिबिर घेण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
आमदार अमोल खताळ म्हणाले, "न्यायालयाने केवळ याचिका सुनावणीसाठी घेतली आहे. नियतीने व जनतेने त्यांचा पराभव केला आहे. त्यांना तो सहन होत नाही. म्हणून ते माझ्यावर खोटेनाटे आरोप करत आहेत. जनता माझ्याबरोबर असल्याने मला काळजी नाही."
विधानसभेत सातत्याने तुकडेबंदीचा विषय लावून धरल्याने राज्यातील ५० लाख नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे. तळेगाव परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी भोजापूर धरण, सिंचन योजना व कालव्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू झाली आहेत. कौठे मलकापूर परिसरात एमआयडीसी उभारण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. नाशिक-पुणे रेल्वेमार्ग संगमनेरमार्गेच व्हावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे, असेही आमदार खताळ यांनी सांगितले.
संगमनेर तालुक्यातून या शिबिरात 10 हजार लाभार्थ्यांनी लाभ घेतला. या शिबिराच्या माध्यमातून तब्बल 1797 फेरफार प्रकरणे निकाली काढण्यात आली. 380 सातबारा उताऱ्यात दुरुस्ती करण्यात आली. साडेचार हजार डिजिटल सातबारा वितरित करण्यात आले. 1700 महसूल प्रमाणपत्र देण्यात आली. एक खिडकी योजनेत 1 हजार 70 अर्ज निकाली काढली गेली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.