Amruta Fadnavis ,Devendra Fadnavis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Amruta Fadnavis : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीसांनी दिल्लीचा विषयच कट केला, नेमकं काय म्हणाल्या?

Amruta Fadnavis Said About Devendra Fadnavis : गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या चर्चा सुरु असून त्यावर आता त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी यावर आता मोठे सूचक भाष्य केले आहे.

Ganesh Sonawane

Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत केंद्रीय मंत्री होणार आहे, भाजपचे केंद्रीय नेतृत्व त्यांना दिल्लीत बोलावून घेणार, अशी जोरदार चर्चा सुरु आहे.

सर्वातआधी मुख्यमंत्री फडणवीस हे केंद्रात जाणार असल्याचा दावा ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला होता. तसेच फडणवीस दिल्लीला गेल्यास मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांना संधी मिळावी, अशी अपेक्षा शिवसेनेतील नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान फडणवीसांच्या दिल्ली वारीच्या या चर्चांवर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना विचारणा केली असता त्यांनी महत्वाचे भाष्य केले आहे.

अमृता फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीतील वर्णीबाबत विचारताच, त्या म्हणाल्या, 'नाही… नाही… मला महाराष्ट्रातच राहायचं आहे, त्यामुळे मी त्यांनाही महाराष्ट्रातच ठेवणार..' त्यांच्या या सूचक विधानाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

दरम्यान, यावेळी अमृता फडणवीस यांनी दिल्लीच्या जंतर मंतर येथे सुरु असणाऱ्या विद्यार्थी आंदोलनाबाबतही आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, जोपर्यंत हे आंदोलन नीट पेपरफुटीबाबत आहे, तोपर्यंत ते योग्य आहे.

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात सरकार पडद्यामागे काम करत होते, आता त्याचे परिणाम दिसत आहेत. फास्ट ट्रॅक कोर्ट, शिक्षा वाढवणे आणि अन्य बदल आणले जात आहेत. विद्यार्थ्यांवर अन्याय नको यासाठी सरकार वेगवेगळे नवे नियम आणत आहे.

विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे, तशी पेपरफुटी नको व्हायला, त्यांची मेहनत वाया जाता कामा नये, त्यांच्यावर अन्याय नको व्हायला याची सरकार तसदी घेत आहे असे अमृता फडणवीस यांनी म्हटले.

यावेळी अमृता फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या रविवारी (दि. २६) मुंबईत होत असलेल्या मोर्चाबाबतही भाष्य केले. त्यांनी म्हटले की, ते एकत्र येऊन काही करत आहेत, हे चांगलं आहे. इतके दिवस ते वेगळे होते. ती गोष्ट सकारात्मक पद्धतीने घेतली पाहिजे.

लाठीचार्जवर मी सांगू इच्छिते की, जंतरमंतरवरील आंदोलनात पोलिसांवर देखील काही समाजकंटकांनी वार केला, काही मुलांवरही वार झाला. हे खूप निंदनीय आहे. तो काळा क्षण होता. हे असे पुन्हा व्हायला नको. आंदोलनातील मुलींशी कुठेही गैरवर्तन झाले असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे अमृता फडणवीस यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT