Amruta Fadnavis: इंधन बचतीच्या मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत अमृता फडणवीसांनी घेतला मोठा निर्णय; शेअर केला व्हिडिओ

Amruta Fadnavis: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन वापराताना काटकसर करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या आवाहनाला मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिसाद दिला आहे.
Amruta Fadnavis
Amruta Fadnavis
Published on
Updated on

Amruta Fadnavis: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन वापराताना काटकसर करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आता दैनंदिन कामांसाठी थेट सायकल वापरण्याचा निश्चय केला आहे. याचा व्हिडिओही त्यांनी आपल्या सोशल मीडियातून शेअर केला आहे. याद्वारे त्यांनी निरोगी जीवनशैलीचा स्विकार करण्याचं आवाहन सर्वांना केलं आहे.

अमृता फडणवीसांचं आवाहन

आपल्या या नव्या अभियानाचा व्हिडिओ शेअर करताना अमृता फडणवीस यांनी एक पोस्टही केली आहे. यात त्या म्हणतात, "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनापासून प्रेरित होऊन, मी माझ्या घरापासून ५ ते ७ किलोमीटरच्या परिघातील सर्व कामांसाठी सायकलचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. पेट्रोल आणि डिझेलची बचत करण्याच्या दिशेने उचललेलं हे एक छोटंसं वैयक्तिक पाऊल आहे. याद्वारे मी निरोगी जीवनशैलीचाही स्वीकार करत आहे. अनेकदा, अर्थपूर्ण बदलांची सुरुवात ही साध्या-सोप्या निवडींमधूनच होत असते," असंही त्यांनी यात म्हटलं आहे.

Amruta Fadnavis
PMC News: मोठी बातमी! पुणे महापालिकेची निवडणूक लढलेले 22 उमेदवार अपात्र; तीन वर्षे लढता येणार नाही निवडणूक

पंतप्रधानांचं देशाला संबोधन

दरम्यान, साधारण दोन आठवड्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दोन जाहीर सभांमधून देशवासियांना इंधनबचतीचं तसंच सोने खरेदी टाळण्याचं आणि शक्यतो घरुनच काम करण्याचं आवाहन केलं होतं. रुपयाचं मुल्य सातत्यानं घसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर परकीय गंगाजळी वाचवण्यासाठी त्यांनी हे आवाहन केलं होतं.

Amruta Fadnavis
Iran-US Row: पेट्रोल-डिझेलं संकट दूर होणार! हार्मुझची सामुद्रधुनी खुली होण्याचा मार्ग मोकळा; US-Iran शांतता कराराच्या मसुद्यावर सहमती

मुख्यमंत्र्यांचा बुलेट बाईकवरुन प्रवास

मोदींच्या आवाहनानंतर सोशल मीडियावरुन टीकेची झोड उठली होती. आधी सत्ताधारी मंत्र्यांनी याची अंमलबजावणी करावी त्यांनी आपली व्हीआयपी ट्रिटमेंट कमी करावी. ताफ्यातल्या गाड्या कमी कराव्यात अशी मागणी सर्वसामान्यांकडून करण्यात येत होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी तर चक्क बुलेट बाईकवरुन मंत्रालयात जात याला सुरुवात केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com