Anil Deshmukh Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Anil Deshmukh News : राज्याच्या माजी गृहमंत्र्यांचं मोठं विधान; म्हणाले, 'विधानसभेला महायुतीमधील तीन पक्ष स्वबळावर लढतील?'

Sachin Waghmare

Jalgaon News : लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे महायुती अजूनही या पराभवाच्या धक्क्यातून सावरली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत काय होणार याची चिंता महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तीन पक्षाला चांगलीच सतावत आहे. त्यातच राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी मोठे विधान केले आहे.

अनिल देशमुख (Anil Deshmukh) रविवारी जळगावच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात काय-काय मोठ्या घडामोडी घडणार? महायुतीमधील तिन्ही पक्ष स्वबळावर लढणार, याबाबत मोठा दावा केला आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Anil Deshmukh News )

येत्या काळात राज्यात पुन्हा एकदा मोठया घडामोडी घडण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुतिच्या तोंडावर खूप बदल होणार आहेत. विशेष म्हणजे अनिल देशमुख यांच्या म्हणण्यानुसार आगामी काळात महायुतीमधील तीनही घटक पक्ष स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे या घडामोडीला जास्त महत्त्व आले आहे.

येत्या काळात भाजप (Bjp) हा शिवसेना शिंदे गटाला स्वतंत्रपणे निवडणूक लढण्यास सांगेल तर अजित पवार गटालाही स्वतंत्रपणे लढण्यात सांगेल, अशी चर्चा आहे. विधानसभा निवडणूक झाली की पुन्हा सर्व एकत्र येऊ, असे सुद्धा भाजपकडून शिंदे गट आणि अजित पवार गटाला सांगितले जात असल्याची चर्चा सध्या जोरात सुरु असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे.

अजित पवार गटातील आमदार पुन्हा परतणार?

येत्या काळात नाराज असलेले अजित पवार (Ajit Pawar) गटातील अनेक आमदार शरद पवार गटात येण्यासाठी इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांच्याकडे येण्यासाठी लाईन लागली आहे. अनेक जिल्ह्यातले अनेक नेते पवार यांच्याकडे यायला तयार आहेत. मात्र, कुणाला घ्यायचे आणि कुणाला घ्यायचे नाही याचा निर्णय शरद पवार घेतील, असेही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT