Anil Gote News: विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या कक्षात १.८४ कोटी रुपये सापडले होते. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते अनिल गोटे यांनी हे पैसे पकडून दिले. मात्र या प्रकरणात गेले तीन दिवस पोलिसांची फक्त चर्चा सुरू आहे. एक ओळीचाही गुन्हा दाखल झालेला नाही.
धुळे गुलमोहर शासकीय विश्रामगृहाच्या खोली क्रमांक १०२ मध्ये बेशोबी एक कोटी ८४ लाख रुपये जप्त करण्यात आले आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार अर्जुन खोतकर अंदाज समितीचे अध्यक्ष आहेत. हे पैसे समितीच्या सदस्यांना वाटण्यासाठी जमा केल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार गोटे यांनी केला होता.
या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक किशोर काळे हे तपास करीत असल्याचे सांगण्यात आले. अद्याप पर्यंत एक ओळीचे ही नोंद कोणत्याही पोलीस ठाण्यात करण्यात आलेली नाही. त्यामुळे तपास कशाच्या आधारे सुरू आहे अशा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हे पैसे दौऱ्यावर आलेल्या आणि शासकीय यंत्रणांनी केलेल्या विकास कामांची तपासणी करणाऱ्या समितीच्या सदस्यांना देण्यासाठी जमा केल्याचे बोलले जाते. हे पैसे थेट शासकीय यंत्रणांनी व त्यातील अधिकाऱ्यांनी जमा केले यात कोणताही संशय नाही. त्यामुळे मध्ये राजकीय पक्ष आणि प्रशासन अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच गेल्या तीन दिवसात फक्त चर्चा सुरू असून कोणतीही कारवाई झालेली नाही.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता या प्रकरणात प्राप्तिकर विभागाची एन्ट्री झाली आहे. नाशिकचे सहाय्यक प्राप्तिकर आयुक्त जे. पी. स्वामी यांनी काल पोलीस अधीक्षकांची दोन तास चर्चा केली. पोलीस याबाबत नोंद करून संबंधित प्रकरण प्राप्तिकर विभागाकडे वर्ग करणार आहे. तसे केल्याने पोलिसांकडे कोणताही तपास राहणार नाही.
याबाबतची सर्व माहिती गोपनीय म्हणून प्राप्तिकर विभाग आपल्याकडे ठेवणार. हा तपास काय झाला?, कोणावर कारवाई झाली?, काय कारवाई झाली?, यातील कुठलीही माहिती कोणालाही यापुढे मिळणार नाही. अशा प्रकारे हे प्रकरण दडपले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या संदर्भात माजी आमदार गोटे यांनी हे प्रकरण उघडकीस आणले. त्यांना देखील जिल्हा पोलीस अधीक्षक धिवरे यांनी कोणतीही माहिती देता येणार नाही, असे उत्तर कळविले आहे. त्यामुळे या सबंध प्रकरणात आता वेगळाच वास येऊ लागला आहे. तपासाचे नाटक करा आणि जनतेला मूर्ख बनवा असा पोलिसांचा प्रयत्न असल्याचा आरोप गोटे यांनी केला. या प्रकरणात धुळ्याचे पुन्हा अन्वेषण विभाग, पोलीस आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सगळ्यांचीच प्रतिष्ठा मलीन झाल्याचा आरोपही गोटे यांनी केला.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.