Kumbh Mela Tree Cutting Politics : कुंभमेळ्यासाठी 1700 झाडे तोडण्याचा घाट महापालिकेने घातला आहे. त्याला स्थानिक नागरिकांसह अनेक नेत्यांचा प्रखर विरोध आहे. त्यामुळे नवा वाद पेटला आहे. त्यातच जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेल्या विधाने संभ्रम निर्माण झाला आहे. त्यांना वृक्षतोडीला विरोध आहे की समर्थन याची चर्चा सुरू झाली आहे.
साधू ग्राम उभारण्यासाठी सतराशे झाडे तोडण्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केले आहे. प्रत्यक्षात तपोवन आतील या जागेवर एक्झिबिशन सेंटर उभारण्यात येणार आहे. त्या माध्यमातून उद्योजकाच्या घशात जमीन जाईल, असा आरोप आहे. त्यातच अण्णा हजारेंचे नव्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. ते म्हणाले, 'मोठी झाडे तोडू नये, लहान झाडे तोडली तर चालतील'.
भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी देखील तपोवनातील आम्ही मोठी झाडं तोडणार नाही, अशी भूमिका जाहीर करत छोटी झाडं तोडणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे एकप्रकारे अण्णा
अण्णा हजारांच्या या अजब सल्ला ते सरकारच्या बाजुचे की वृक्षतोडीला विरोध करणाऱ्यांच्या यावर गोंधळ आहे. दरम्यान,नाशिककर नागरिक कोणतेही झाड तोडण्यास नकार देत आहेत. याठी प्रखर आंदोलन उभे राहिले आहे. काँग्रेसचे नेते राजेंद्र बागुल यांनी यावर मोठा लढा उभा केला आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी कोणतेही झाड तोडू नये, अशी प्रखर भूमिका घेतली आहे.
असे असताना अण्णा हजारे यांनी लहान झाडे तोडली तर चालतील, असा तर्क मांडले आहे. सामान्यता अण्णा हजारे यांची भूमिका काय? असा नवा गोंधळ यातून उभा राहू शकतो. लहान झाडे कोणती आणि मोठी झाडे कोणती हे कसे ठरवणार? या शब्दात वृक्षप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृक्षतोडीचे समर्थन केले आहे. त्यामुळे भाजपचे संकट मोचक मंत्री गिरीश महाजन झाडे तोडण्यासाठी हट्टला पेटले आहेत. महापालिका प्रशासन देखील सरकारच्या आदेशाचे पालन करण्यास आतुर आहे. तर, शालेय विद्यार्थ्यांपासून तर सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी आणि विविध संघटना वृक्षतोडीच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि अगदी शिवसेना शिंदे पक्षानेही वृक्षतोडीला विरोध केला. त्यामुळे भाजप एकटा पडला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.