BJP Vs Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोमणा, भाजपचे नेते संतापले; म्हणाले, 'ते फक्त टिकल्या लावतात...'

Assembly Winter Session: उद्धव ठाकरे यांनी आज हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुती सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले. लाडक्या बहिणींना 2100 दिले नाही, तर सरकारलाच घरी बसावे लागले असे सांगून या सरकारमधील रोज एक नव्या नेत्यांचे घोटाळे बाहेर येत असल्याचे सांगितले.
Uddhav Thackeray On BJP Fadnavis
Uddhav Thackeray On BJP FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर बोचरी टीका केली. मुख्यमंत्र्यांना रोज एका मंत्र्याला वाचवावे लागत आहे. त्यापेक्षा त्यांनी एक पांघरूण मंत्री नियुक्त करावा असा टोमणा मुख्यमंत्र्यांना मारला. त्यामुळे भाजपचे नेते चांगलेच चिडले.

गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी तुम्ही टिकली लावायला अधिवेशनात येता त्यापेक्षा एखादी महापालिका जिंकून दाखवा असे आव्हान दिले तर प्रवीण दरेकर यांनी ठाकरेंनी कोट्या, टोमण्यांचा खेळ बंद करावा नाहीतर उरलेसुरले दुकानही बंद करावे लागेल,असा इशारा दिला.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गुरुवारी(ता.11) हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुती सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले. लाडक्या बहिणींना 2100 दिले नाही, तर सरकारलाच घरी बसावे लागले असे सांगून या सरकारमधील रोज एक नव्या नेत्यांचे घोटाळे बाहेर येत असल्याचे सांगितले.

त्यामुळे मुख्यमंत्र्यांना सध्या एकच काम उरले आहे. आपल्या मंत्र्यांना आणि नेत्यांची बाजू मांडावी लागत आहे. त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर पांघरूण घालावे लागत असल्याची टीकाही त्यांनी केली, या टीकेचा समाचार गिरीश महाजन यांनी घेतला.

Uddhav Thackeray On BJP Fadnavis
Maharashtra Flood: अतिवृष्टीच्या मदतीचा मुद्दा पेटला; ओमराजेंसह 25 खासदारांनी उचललं मोठं पाऊल, केंद्रीय कृषिमंत्र्यांविरोधात अविश्वास प्रस्ताव?

उद्धव ठाकरेंनी यांनी मुख्यमंत्री यांना ॲनाकोंडा म्हणणे तसेच बेछूट आरोप करणे बंद करावे. तुम्ही आधी आरशात बघा. तुम्ही काय होते आणि काँग्रेससोबत जाऊन काय झाले. मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती यांनी एका मंदिराच्या प्रकरणात दिलेल्या निर्णयामुळे इंडिया आघाडीचे नेते दुखावले आहेत. त्यांनी न्यायाधीशावर महाभियोग दाखल करण्यास स्वाक्षरी केली. त्यांच्यासोबत राहताना तुम्हाला जनाची नाही तर मनाची लाज वाटायला पाहिजे.

बाबासाहेबांचे विचार त्यांनी आधीच सोडले. सोबतच त्यांनी आता हिंदुत्वही सोडले असल्याचे दिसून येते. बांधावर जाऊन ते पुतना मावशीचे प्रेम दाखवत आहे. त्यापेक्षा त्यांनी सभागृहात बसावे, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडावे असा सल्ला प्रवीण दरेकर यांनी दिला.

Uddhav Thackeray On BJP Fadnavis
Parth Pawar News: मोठी बातमी: पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला दणका; सह जिल्हा निबंधक कार्यालयानं दिले 'हे' महत्त्वाचे आदेश

तुम्ही बाबासाहेबांचे सुपुत्र आहात. हिंदुत्वाची कणखर भूमिका घेणे तुमच्याकडून अपेक्षित आहे. मात्र तुम्ही टिकली लावल्यासारखे अधिवेशनात येता. बेछूट आरोप करून निघून जातात. सरकाराला सल्ले देण्यापेक्षा एखादी महापालिका जिंकून दाखवा असे आव्हान त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिले. उद्धव ठाकरे यांचे टोमणे व कोट्यांना जनता विटली आहे.

बाबासाहेबांचे विचार त्यांनी आधीच सोडले. सोबतच त्यांनी आता हिंदुत्वही सोडले असल्याचे दिसून येते. बांधावर जाऊन ते पुतना मावशीचे प्रेम दाखवत आहेत. त्यापेक्षा त्यांनी सभागृहात बसावे, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडावे, असा सल्ला प्रवीण दरेकर यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com