Shivraj Patil Passes Away : माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन

Ex-Union Home Minister Shivraj Patil Passes Away congress : लातूरचे माजी खासदार, माजी क्रेंदीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचे वयाच्या 90 व्या वर्षी लातूर येथील त्यांच्या निवास्थानी निधन झाले.
Shivraj Patil Passes Away
Shivraj Patil Passes Awaysarkarnama
Published on: 
Updated on: 

Shivraj Patil News : माजी केंद्रीय गृहमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांचे आज सकाळी लातूर येथे निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. तब्बल सात वेळा ते लातूरचे खासदार राहिले आहेत. वाढत्या वयामुळे मागील काही काळापासून ते आजारी होते. घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी साडेसहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

काँग्रेसचे एकनिष्ठ नेते.गांधी परिवारचे जवळचे नेते, सोनिया गांधीचे विश्वासू म्हणून त्यांचे ओळखले जात होते. लोकसभेचे अध्यक्षपद तसेच केंद्रीय गृहमंत्री तसेच विविध खात्याचे मंत्रि‍पदे त्यांनी भूषवली होती.

शिवराज पाटील यांनी पंजाबचे राज्याचे राज्यपाल पद देखील भूषवले आहे. त्यांच्या राजकीय कारकि‍र्दीची सुरुवात लातूर ग्रामीण मतदारसंघातून झाली होती. ते 1973 मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून विजयी झाले होते.पुढे त्यांना मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

Shivraj Patil Passes Away
Pune BJP: पुणे महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी भाजपतर्फे तब्बल 2 हजार 350 इच्छुकांची तयारी; उद्यापासून धडधड वाढणार

खासदार म्हणून विजय

1980 मध्ये ते प्रथम लोकसभेच्या मैदानत उतरले. आणि खासदार म्हणून विजयी झाले. सलग सात वेळा त्यांनी लातूर लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. 2004 ला मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्रि होते.

Shivraj Patil Passes Away
BJP Vs Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोमणा, भाजपचे नेते संतापले; म्हणाले, 'ते फक्त टिकल्या लावतात...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Jayant Patil
Supreme Court
Union Agriculture Minister Shivraj Singh Chouhan expressed anger over the demolition of homes in Kosmi village, Madhya Pradesh, and called for justice for affected families.
Maharashtra Youth Congress chief Shivraj More