Anil Patil
Anil Patil  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Anil Patil News: राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप; अनिल पाटलांचे सूचक विधान

कैलास शिंदे :सरकारनामा ब्युरो

Jalgaon Politics : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाजप सोबत जाण्याच्या चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे प्रवक्ते राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी आगामी काळात अनेक राजकीय बदल घडतील आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका सत्तेतील तिन्ही पक्ष एकत्रित लढवतील, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

अमळनेर येथील निवासस्थानी त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचे आपण साक्षीदार होतो. त्यावेळी सर्व ठरवूनही माघार घ्यावी लागली होती. आता आम्ही भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय सर्वांनी चर्चा करून ठरवून घेतला. आता कोणत्याही परस्थितीत माघार होणार नाही. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा नेता भाजपसोबत येण्याची चर्चा सुरू आहे. यावरूनच समजून घ्या.

आगामी काळात मोठे राजकीय बदल होणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. एक कॅबनेट मंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणार आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रवादीचा आणखी एक मंत्री होणार हे निश्चित आहे. शिवाय आगामी काळात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजिदादा गट) आणि शिवसेना शिंदेगट एकत्रित लोकसभा निवडणूक लढविणार आहोत. त्यात कोणताही बदल होणार नाही.आगामी निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढविण्यात येतील असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

अमळनेर तालुक्याला प्रथमच मंत्रीपद मिळाले आहे, त्याच्या माध्यमातून आपण तालुक्याचा विकास करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तालुक्यातील पाडळसरे धरणाचे काम सुरू झाले आहे. पुढील कामही वेगात व्हावे यासाठी आपण १७ टीएमसी पाण्यासाठी करण्यात येणाऱ्या कामाच्या दोन टप्प्यासाठी एकाच वेळी मंजुरी आणणार आहोत. पहिल्या टप्प्यातील कामासाठी ४हजार ३००कोटीचा निधी मंजूर करून आणणार आहोत. अमळनेर तालुक्यात चार लाख हेक्टर क्षेत्र या पाण्यामुळे सिंचनाखाली येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Edited By-Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT