Nashik News : शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि डॉ. अपूर्व हिरे यांच्यातील राजकीय कुरघोडीचे राजकारण संपण्याची चिन्हे नाहीत. या राजकारणाला कंटाळून अपूर्व हिरे उद्या भाजप प्रवेश करणार आहेत. भाजप प्रवेशाचे स्वागत अपूर्व हिरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून झाले आहे.
दादा भुसे आणि हिरे कुटुंबीय यांच्यातील राजकीय वैमनस्य किती टोकाला गेले आहे, याचा प्रत्यय पुन्हा आला आहे. गेल्या वर्षभरात हिरे कुटुंबीयांच्या विरोधात विविध गुन्हे दाखल झाले आहेत. या राजकीय जाचाला कंटाळूनच अपूर्व हिरे बुधवारी भाजप प्रवेश करणार होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉ. अपूर्व हिरे भाजप प्रवेश करण्याच्या पूर्वसंध्येलाच पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यांच्या विरोधात मालेगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. व्यंकटेश बँकेतून शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या नावावर कोट्यावधीचे कर्ज काढण्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
हिरे कुटुंबीयांची संस्था असलेल्या महात्मा गांधी विद्या मंदिरचे उपशिक्षक विलास दिगंबर पवार यांनी तक्रार केली आहे. पवार यांनी व्यंकटेश बँकेचे सात लाख रुपये कर्ज घेतले होते. त्याबाबत चौकशी करण्यासाठी गेले असता त्यांच्या नावावर हिरे कुटुंबीयांच्या निकटवर्ती यांनी 14 लाख रुपये कर्ज घेतल्याचे आढळले. याबाबत संबंधित कर्मचारी तक्रार करणार असल्याचे समजताच एक रकमी योजनेअंतर्गत तातडीने हे कर्ज बँकेत भरण्यात आले.
संबंधित कर्मचारी विलास पवार याने याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी विविध कर्मचाऱ्यांच्या नावाने एक कोटी 95 लाख रुपये कर्ज वितरित झाल्याचे आढळले. कर्ज हिरे कुटुंबीयांकडे नोकरी करणाऱ्या आणि कुटुंबीयांची निकटचा संबंध असलेल्या नागरिकांनी घेतल्याचे आढळले.
संबंधित कर्ज विविध कर्मचाऱ्यांच्या नावाने घेण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र हे कर्ज हिरे कुटुंबीयांनी स्वतःसाठी घेतले असल्याचा दावा पवार यांनी केला आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या नावे कर्ज घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघड झाल्याचा दावा आहे. त्यामुळे सोमवारी रात्री उशिरा मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी राज्यमंत्री प्रशांत हिरे, डॉ. अपूर्व हिरे, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या विरोधात फसवणूक आणि विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपूर्व हिरे उद्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे. त्याच्या पूर्वसंध्येलाच त्यांना मोठा झटका बसला आहे. यामागे त्यांचे राजकीय विरोधक सक्रिय असल्याचे लपून राहिलेले नाही. त्यामुळे भाजप प्रवेश केल्यानंतरही हिरे विरुद्ध भुसे हे राजकारण संपण्याची चिन्हे नाहीत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.